Zeenews logo
English   
Wednesday, June 19, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

... अन् भुजबळांना अश्रू झाले अनावर

... अन् भुजबळांना अश्रू झाले अनावर www.24taas.com, मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझ्यासाठी वडिलांप्रमाणेच होते... ते आपल्यात नाहीत ही कल्पनासुद्धा करवत नाही, असं म्हणत छगन भुजबळ भावूक झाले. ते ‘झी २४ तास’शी बोलत होते.

‘बाळासाहेबांचं निश्चितच माझ्यावर प्रेम केलं. मी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आम्ही एकमेकांपासून दूर झाल्यानंतरही त्यांनी आमच्यावर कडाक्यानं लक्ष ठेवलं. व्यक्तिगत पातळीवर आमचे संबंध होते. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मी अनेकवेळा बाळासाहेबांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला... पण, ज्यावेळी मी त्यांना भेटायला गेलो त्यांच्या बोलण्यात कटूतेचा लवलेशही नव्हता’ असं म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ भूतकाळात हरवले.

‘बाळासाहेब ठाकरे माझ्यासाठी वडिलांप्रमाणेच होते. त्यांचा आशिर्वाद हा आमच्या घरातही वडिलांसारखाच मानला जायचा. त्यांच्यारूपानं एक ठाम व्यक्तिमत्त्वच महाराष्ट्राला मिळालं होतं... आणि आज ते आपल्यात नाहीत ही कल्पनासुद्धा करवत नाही, असं म्हणत छगन भुजबळांचा आवाज रडवेला झाला आणि त्यांना अश्रू आवरता येणं शक्य झालं नाही. त्यांच्या आवाजावरून हे स्पष्ट कळून येत होतं. ते झी २४ तासशी फोनवरून बोलत होते.

हिंदुह्रद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज दुपारी ३.३० वाजता अखेरचा श्वास घेतला. बाळासाहेबांच्या निधनामुळे समस्त शिवसैनिक आणि मनसैनिकासह संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगरच कोसळलाय.


First Published: Saturday, November 17, 2012, 19:50

प्रतिक्रिया

Yogesh Sawant - Mumbai
ek vaagh shant zala pan tyani phodaleli darakali hi asamantat satat darvalhat rahil
प्रतिक्रिया द्या

mayur - satara
ata fakt sena shillak ahe! khari garaj ata ahe
प्रतिक्रिया द्या

mayur - satara
ata fakt sena shillak ahe! khari garaj ata ahe
प्रतिक्रिया द्या

balwant parab - thane
marathi manacha raja gela
प्रतिक्रिया द्या

Pawan Kaduskar - Pune
साहेब तुम्ही परत हात दाखवणार होते ना मातोश्रीवरुन... तो हात आशीर्वादासाठी हवाहोता साहेब.. तुमचा निरोप घेण्यासाठी नको होता... तुम्ही खोटं बोललात साहेब... आम्हाला हवे होतात साहेब तुम्ही...
प्रतिक्रिया द्या

Sharad ranbhare - Ickalkaranji
1404 madhala 1 wagh harapala
प्रतिक्रिया द्या

Sharad ranbhare - Ickalkaranji
1404 madhala 1 wagh harapala
प्रतिक्रिया द्या

Pawan Kaduskar - Pune
साहेब तुम्ही परत हात दाखवणार होते ना मातोश्रीवरुन... तो हात आशीर्वादासाठी हवाहोता साहेब.. तुमचा निरोप घेण्यासाठी नको होता... तुम्ही खोटं बोललात साहेब... आम्हाला हवे होतात साहेब तुम्ही...
प्रतिक्रिया द्या

Mahesh swami - Latur
आम्हा मराठी माणसाचा विठ्ठल गेला , कसे होणार होता आमचे ?
प्रतिक्रिया द्या

TEJAS POTNIS - BADLAPUR
lost our brave godfather. the condition is now king without kingdom.
प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: