मुंबईतील रस्त्यांवर शुकशुकाट, Bal Thackeray sick - peace in Mumbai

मुंबईतील रस्त्यांवर शुकशुकाट

मुंबईतील रस्त्यांवर शुकशुकाट
www.24taas.com,मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची बुधवारी (१४ नोव्हेंबर) प्रकृती अधिकच खालावली आणि संपूर्ण राज्यात चिंतेचे सावट पसरले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काळजी. काल सायंकाळपासून एकच नाव ऐकायला मिळत होते ते बाळासाहेब यांचे. त्यांची कशी आहे प्रकृती? त्यांच्यासाठी प्रत्येक जण प्रार्थना करीत आहे. त्याच दरम्यान, मुंबईची गतीही एकदम संत झाली. रात्री दहानंतर मुंबई कासव गतीने धावत होती. ही गती सकाळी जवळपास बंदच झाली. मुंबईतील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. तर दुकानेही उत्स्फुर्त बंद ठेवण्यात आली आहेत.

मुंबईतील रस्त्यात गटागटाने बाळासाहेबांची चौकशी करण्यात येत होती. कोणी ओळखीचा भेटला तर त्याच्याशीही चौकशी केली जात होती. नेहमी गर्दीने फुल असणाऱ्या बस आणि रेल्वेमध्ये कमीप्रमाणात प्रवासी दिसत होते. रेल्वेमध्ये प्रवासी बाळासाहेबांबद्दल आपुलकीने चौकशी करताना दिसत होते. काहीजण टिव्हीच्यामाध्यमातून मोबाईलवरून घरी संपर्क साधून माहिती जाणून घेत होते, असे त्यांच्या बोलण्यावरून दिसून येत होते.

मुंबईत रिक्षा, टॅक्सी उत्स्फुर्त बंद ठेवल्यामुळे काही मुंबईकरांना पायपीट करावी लागली. तर अनेकांनी ऑफिसला जाण्याचे टाळले. अनेक भागांमध्ये दुकाने बंद होतीत. काही ठिकाणी जमावाने तोडफोड केल्याचे वृत्त आहे. ही बाब वगळता कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. बस प्रशासनाने जादा गाड्या सोडण्याची तयारी केली होती. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा आल्याचे वृत्त समजताच. रद्द केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्या पुन्हा दिल्या. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

First Published: Thursday, November 15, 2012, 12:29


comments powered by Disqus