बाळासाहेब आणि मीनाताई

By Jaywant Patil | Last Updated: Sunday, November 18, 2012 - 00:35

www.24taas.com, मुंबई
१४ जून १९४८ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सरला वैद्य यांच्याशी विवाह केला आणि सरला वैद्य मीना ठाकरे म्हणून बाळासाहेबांच्या संसारात आल्या. शिवसेनेतील तमाम शिवसैनिकांसाठी भविष्यात त्या मीनाताई बनल्या.

बाळासाहेब आणि मीनाताईंना तीन मुलं झाली. बिंदा (बिंदूमाधव), टिब्बा (जयदेव) आणि डिंगा (उद्धव) या तीन मुलांवर बाळासाहेब व्यस्त दिनक्रमात सुसंस्कृत बनवण्याचं काम मीनाताईंनी केलं. मातोश्रीवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा पाहुणचार स्वतः मीनाताई करत. खुद्द बाळासाहेब अनेकवेळा मीनाताईंसारखी पत्नी मिळाली, हे आपलं सौभाग्य मानायचे.
मीनाताईंनी शिवसेनेच्या प्रत्येक सभेला हजेरी लावली. महिला आघाडी तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. २० एप्रिल १९९६ रोजी त्यांचा थोरला मुलगा बिंदुमाधव यांचा अपघातात मृत्यू झाला. आणि या नंतर ४ महिन्यांतच ६ सप्टेंबर १९९६ रोजी मीनाताई ठाकरेंचा मृत्यू झाला. मीनाताईंच्या मृत्यूमुळे बाळासाहेबांना विलक्षण धक्का बसला होता. मात्र तरीही शिवसेनेचं कार्य त्यांनी अव्याहत चालू ठेवलं. त्यांच्या कुर्त्याच्या खिशात कायम मीनाताईंचा फोटो असायचा.

First Published: Sunday, November 18, 2012 - 00:35
comments powered by Disqus