बाळासाहेबांच्या नाडीचे, हृद्याचे ठोके व्यवस्थित सुरू

शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी शिवसेनाप्रमुखांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचा निर्वाळा आज सकाळी दिला.

Updated: Nov 17, 2012, 12:44 PM IST

www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी शिवसेनाप्रमुखांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचा निर्वाळा आज सकाळी दिला. शिवसेनाप्रमुखांच्या नाडीचा वेग आणि हृदयाचे ठोके योग्य प्रमाणात आहेत असे डॉक्टरांनी सांगितले. मातोश्रीबाहेरील हजारोंची गर्दी आणि देशभरातील करोडोंच्या प्रार्थनांना यश आले. शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या 'सामना'मध्ये हि निर्वाळा करण्यात आला.
लीलावती रुग्णालयाचे डॉ. जलील परकार, डॉ. प्रकाश जियंदानी, डॉ. समद अन्सारी यांची टीम शिवसेनाप्रमुखांवर उपचार करीत आहे. शिवसेनेचे आमदार डॉ. दीपक सावंत हेही त्यांना सहाय्य करीत आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९८ टक्के असून नाडीचा वेग आणि हृदयाचे ठोके व्यवस्थित आहेत.
रक्तदाबही ठीक आहे. ते आणखी चांगल्या प्रकारे उपचारांना प्रतिसाद देतील अशी आशा आहे, असेही उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले.