सेनेबरोबर काँग्रेस-राष्ट्रवादीलाही हवंय `साहेबां`चं नाव...

दादर स्टेशनला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्यावं, अशी मागणी शिवसेनेनं नाही तर चक्क काँग्रेसनं केलीय. काँग्रेसच्या नगरसेविका नयना शेठ यांनी ही मागणी केलीय.

www.24taas.com, मुंबई
दादर स्टेशनला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्यावं, अशी मागणी शिवसेनेनं नाही तर चक्क काँग्रेसनं केलीय. काँग्रेसच्या नगरसेविका नयना शेठ यांनी ही मागणी केलीय.
आज सभागृहात शिवाजी पार्कात बाळासाहेबांचे स्मारक व्हावं, या शिवसेनेच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिलाय. मुंबई महापालिकेतील सभागृह नेते धनंजय पिसाळ यांनी शिवाजी पार्कात बाळासाहेबांचे स्मारक व्हावं, अशी मागणी केलीय. तर शिवसेनेचे सभागृह नेते यशोधर फणसे यांनी शिवाजी पार्कातच बाळासाहेबांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, अशी मागणी केलीय. तसंच न्हावाशेवा-शिवडी सीलिंक आणि कोस्टल रोडलाही बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी त्यांनी मुंबई महापालिका सभागृहात केलीय.