मातोश्री... बाळासाहेबांच्या मृत्यूची घोषणा होण्याअगोदर!

By Shubhangi Palve | Last Updated: Saturday, November 17, 2012 - 22:59

www.24taas.com, मुंबई
बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत दुपारी साडे तीन वाजता मालवल्याचं बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉ. जलील पारकर यांनी जाहीर केलं. पण ही घोषणा होण्याअगोदर बाळासाहेबांची प्रकृती जास्त बिघडल्यानं मातोश्रीवर बराच वेळ तणाव निर्माण झाला होता. हा तणाव उद्धव ठाकरे यांना सहन झाला नाही आणि ते चक्कर येऊन पडले.
दुपारी अडीच वाजल्यापासून मातोश्रीवर काय काय घडलं, याचा हा वृत्तांत...
दुपारी २.३० वाजता - बाळासाहेबांचा पल्स रेट आणि ब्लड प्रेशर खूपच कमी झालं.
दुपारी २.३५ - व्हेंन्टिलेटर आणि लाईफ सपोर्ट सिस्टिमवर असलेल्या बाळासाहेबांचे ब्लड प्रेशर नॉर्मल करण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले.
दुपारी २.४५ - बाळासाहेबांची प्रकृतीविषयी ठाकरे कुटुंबीयांना कल्पना दिली गेली.
दुपारी २.५५ - राज ठाकरे यांना बाळासाहेबांच्या प्रकृतीबद्दल कळवण्यात आलं.
दुपारी ३.१५ - राज ठाकरे पत्नी शर्मिलासह मातोश्रीवर दाखल झाले.
दुपारी ३.२० - बाळासाहेबांना ह्रदयविकाराचा झटका आला. उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट समजताच त्यांना जबरदस्त धक्का बसला आणि ते चक्कर येऊन पडले.
दुपारी ३.३० ते ३.३३ - बाळासाहेबांना लावण्यात आलेलं लाईफ सपोर्ट सिस्टिम काढण्यात आली. डॉक्टरांना बाळासाहेबांना वाचवण्यात अपयशी आलं.
दुपारी ३.४० ठाकरे कुटूंबातील महिलांना मोठा धक्का बसला. महिलांना अश्रू अनावर झाले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र यांनी सर्व शिवसेना नेत्यांना फोन केले. शिवसेनेचे आणि मनसेचे महत्त्वाचे नेते तातडीनं मातोश्रीवर दाखल झाले.
दुपारी ४.४५ डॉ. जलील पारकर यांनी माध्यमाच्या प्रतिनिधींसमोर बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्याचं जाहीर केलं.

First Published: Saturday, November 17, 2012 - 22:54
comments powered by Disqus