गोपीनाथ मुंडे मातोश्रीवर दाखल

गोपीनाथ मुंडे मातोश्रीवर दाखल झालेत. बाळासाहेबांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यापासून राज्यातल्या सर्वच नेत्यांनी मातोश्रीकडे धाव घेतलीये.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 15, 2012, 09:19 AM IST

www.24taas.com,मुंबई
गोपीनाथ मुंडे मातोश्रीवर दाखल झालेत. बाळासाहेबांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यापासून राज्यातल्या सर्वच नेत्यांनी मातोश्रीकडे धाव घेतलीये.
गोपीनाथ मुंडे यांनीही मातोश्रीवर बाळासाहेबांच्या चौकशीसाठी धाव घेतलीये. शिवसैनिकांची रात्रीची गर्दी सकाळीही कायम होती. शिवसैनिक मातोश्री परिसरातच होते. तर पोलीस प्रशासनानही मातोश्री परिसरात मोठा फौजफाटा तैनात केलाय. मातोश्रीबाहेरच्या सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आलीय. रॅपिड ऍक्शन फोर्सची तुकडीही मुंबईत तैनात करण्यात आलीय.
मातोश्रीबाहेरचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. सगळ्या पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्यायत. त्याचवेळी शिवसैनिकांनी कोणताही अनुचित प्रकार करु नये, तसंच शांतता आणि संयम बाळगावा, असं आवाहन स्वतः उद्धव ठाकरे यांनी केलंय.