शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीच्या बातम्या पाकिस्तानतही

By Jaywant Patil | Last Updated: Thursday, November 15, 2012 - 18:24

आदित्य निमकर, www.24taas.com, नवी दिल्ली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीच्या बातम्यांनी फक्त मुंबई आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रांचीही पानं भरली आहेत. इतर वेळी केवळ मुंबईचे आणि महाराष्ट्रातील एक पक्ष संस्थापक मानले गेलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची बातमी बीबीसी सारख्या अव्वल वृत्तवाहिनीनेही दिली आहे.
बाळासाहेबांची प्रकृती आता सुधारली असल्याची बातमी बीबीसी वृत्तवाहिनीने दिली आहे. यामध्ये बाळासाहेबांचा उल्लेख हिंदू नेते आणि शिवसेनाप्रमुख असा केला जात आहे. तसंच पाकिस्तानच्या प्रमुख वृत्तपत्रांनीही ही बातमी ठळक मथळ्यांत छापल्या आहेत. यामुळे बाळासाहेबांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर कितीही टीका यापूर्वी केली गेली असली, तरी त्यांच्या तब्येतीची दखल जागतिक पातळीवर घेतली जात आहे.
मातोश्रीबाहेर चिंतेपोटी हजारो शिवसैनिक कलानगर येथे जमले आहेत. मुंबईमध्ये अघोषित बंद पुकारला गेल्याचं चित्र दिसतंय. बाळासाहेब आणि मुंबई यांचं नातं अतुट आहे. तसंच संपूर्ण महाराष्ट्र बाळासाहेबांबद्दल काय माहिती मिळतेय, याकडे लक्ष लावून बसला आहे. अशा परिस्थितीमध्ये बाळासाहेब यांच्याबद्दल मुंबई आणि महाराष्ट्रातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील वृत्तसंघटनांनाही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष केंद्रीत करावं लागलं आहे.

First Published: Thursday, November 15, 2012 - 14:33
comments powered by Disqus