राज ठाकरेंकडून शिवाजी पार्कची पाहाणी

By Surendra Gangan | Last Updated: Sunday, November 18, 2012 - 08:30

www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी रात्री उशिरा दादर येथील शिवाजी पार्क आणि परिसराची पाहणी केली. बाळासाहेब यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज यांनी पाहाणी केली.
बाळासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी महाराष्ट्रातून जनसागर लोटण्यास सुरूवात झाली आहे, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे रविवारी मुंबई आणि दादर परिसरात प्रचंड गर्दी होऊ शकते. त्याची व्यवस्था पाहण्यासाठी राज यांनी शिवाजी पार्क परिसराची जातीने पाहाणी केली.
बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती खालवल्यापासून राज ठाकरे यांनी क्षणाचा विलंब न लावता मातोश्रीवर ठाण मांडले होते. ते वेळोवेळी लक्ष ठेवून होते. कृष्णकुंज ते मातोश्री अशा त्यांच्या फेऱ्या वाढल्या होत्या. बाळासाहेबांच्या अखेरच्या क्षणीही ते मातोश्रीवर उपस्थित होते.

First Published: Sunday, November 18, 2012 - 08:26
comments powered by Disqus