राणेंनी केला उद्धव ठाकरेंना फोन, साहेबांना भेटायचं आहे...

Last Updated: Friday, November 16, 2012 - 20:38

www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या प्रकृतीविषीयी समजताच उद्योग मंत्री नारायण राणे यांनाही बाळासाहेबांची भेट घ्यावीशी वाटते आहे. प्रकृतीसंदर्भात चिंता व्यक्त होत असल्याने अनेक राजकीय नेत्यांनी राणेंची भेट घेतली होती. त्यामुळेच नारायण राणेंनाही बाळासाहेबांची भेट घेण्याची इच्छा आहे. त्यासाठी नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला. तेव्हा उद्धव ठाकरेंकडून राणेंना सांगण्यात आलं की, दोन दिवसांत फोन करून वेळ कळविण्यात येईल.
मात्र अजूनही फोन आला नसल्याचे कळते आहे, मात्र अजूनही फोन येईल आणि बाळासाहेबांची भेट होईल अशी आशा राणेंना वाटते आहे. शिवसेनाप्रमुखांशी वाद झाल्यानंतर राणेंनी सेना सोडल्यापासून मातोश्रीचे दरवाजे त्यांना बंद झाले होते. राणे आणि सेना यांच्यातील वाद नेहमीच उफाळून यायचे.
बाळासाहेबांनी राणेंवर नेहमीच टीका केली, त्याला राणेंनी कधीही उत्तर दिलं नाही. मात्र उद्धव ठाकरेंवर राणेंनी नेहमीच जहरी टीका केली. तर उद्धव यांनीही राणेंना चांगलंच ठणकावलं होतं. त्यामुळे त्याच्यांत वाद होत होते. मात्र बाळासाहेब यांना भेटण्यासाठी राणे मातोश्रीवर जाण्यास इच्छुक असल्याचे समजते.

First Published: Friday, November 16, 2012 - 20:11
comments powered by Disqus