मातोश्रीवर जायचयं, उद्धव यांची भेट घ्यायचीये- राणे

Last Updated: Saturday, November 24, 2012 - 14:38

www.24taas.com, मुंबई
उद्योगमंत्री नारायण राणे यांनी काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. बाळासाहेबांचे निधन झाल्यानंतर राज यांचे सांत्वन करण्यासाठी ते त्यांच्या निवासस्थानी गेले होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्‍या निधनानंतर सांत्‍वन करण्‍यासाठी ते राज यांच्‍या भेटीला गेले. त्‍यानंतर आता ते `मातोश्री`वरही जाण्‍याची शक्‍यता आहे. उद्धव ठाकरे यांना भेटीसाठी राणे यांनी वेळ मागितली आहे. उद्धव त्‍यांना वेळ देतात का, याकडे लक्ष लागले आहे.
बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांच्या सांत्वनासाठी नारायण राणे यांनी मातोश्रीवर जाण्याची परवानगी मागितल्याचे समजते. `साहेबांची शेवटपर्यंत भेट झाली नाही, याचं शल्य आयुष्यभर मला राहील...` असं म्हणत नारायण राणे यांनी प्रचंड दु:ख व्यक्त केलं होतं. नारायण राणेंनी `झी २४ तास`कडे त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. मला नगरसेवक ते मुख्यमंत्री या पदापर्यंत साहेबांच्या आणि फक्त साहेबांच्याच कृपेने पोहचलो, अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली.

First Published: Saturday, November 24, 2012 - 14:29
comments powered by Disqus