बाळासाहेबांशी काय बोलावं सुचलंच नाही, शरद पवार भावूक

केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्यातील मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. शरद पवार हे भेटीसाठी `मातोश्री`वर गेले होते.

Updated: Nov 15, 2012, 02:38 PM IST

www.24taas.com, मुंबई
केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्यातील मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. शरद पवार हे भेटीसाठी `मातोश्री`वर गेले होते. बाळासाहेब आणि पवारांची मैत्री ही राजकारणापलिकडची असल्याचे मानले जाते. या मैत्रीचे महाराष्ट्रासह देशाला नेहमी कुतूहल राहिले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी पवार `मातोश्री`वर आले. बाळासाहेबांना पाहून पवारांना गहिवरुन आले. काय बोलावे हे त्यांना सुचत नव्हते. यावेळी त्यांच्यासोबत वसंत डावखरे होते. तिथे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेही उपस्थित होते.
बाळासाहेबांना पाहिल्यानंतर पवारांनी उद्धव यांच्याशी बातचीत केली. यावेळी पवारांनी बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमकडून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली.