अन् शिवसेना भवन पुन्हा उजळले...

By Prashant Jadhav | Last Updated: Friday, November 16, 2012 - 09:39

www.24taas.com, मुंबई
बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृतीत सुधारणा झाल्याने शिवसेना भवन येथे करण्यात आलेली विद्युत रोषणाई पुन्हा सुरू करण्यात आली. बाळासाहेबांची प्रकृती बिघडल्याने ही विद्युत रोषणाई बंद करण्यात आली होती.
ठाकरे परिवारासह तमाम शिवसैनिकांनी बुधवारपासून दिवाळी साजरी केली नाही. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी दादर या पक्षाच्या बालेकिल्ल्यात शिवसेना भवनासमोर बाळासाहेबांचे छायाचित्र असलेला भव्य आकाशकंदील लावण्यात आला होता. तोही ज्येष्ठ नेत्यांच्या सूचनेवरून बुधवारी काढण्यात आला.
दीपावलीनिमित्त करण्यात आलेली रोषणाईही काढण्यात आली. गुरुवारी सायंकाळी डॉक्टरांच्या उपचारांना बाळासाहेब प्रतिसाद देत असल्याचे शिवसेना नेते आमदार सुभाष देसाई यांनी जाहीर केले अन् शिवसैनिकांत उत्साह संचारला. काही वेळातच पुन्हा ज्येष्ठ नेत्यांच्या सूचनेवरून शिवसेना भवनावरील विद्युत रोषणाई सुरू करण्यात आली.

First Published: Friday, November 16, 2012 - 09:39
comments powered by Disqus