बाळासाहेब ठाकरेंनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

By Surendra Gangan | Last Updated: Monday, November 12, 2012 - 07:35

www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर आहे. बाळासाहेब यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, राज ठाकरे यांनीही मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी केली.
शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीनिमित्त माझ्या शुभेच्छा, असा संदेश त्यांनी दिला आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला काळजी आहे, असे राऊत म्हणाले.
बाळासाहेबांची विचारपूस करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेच्या प्रवक्‍त्या आमदार नीलम गोऱ्हे मातोश्रीवर गेल्या होत्या. बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांनी वर्तमानपत्रांतील बातम्यांविषयी चौकशी केली, असे गोऱ्हे यांनी भेटीनंतर सांगितले.

First Published: Monday, November 12, 2012 - 07:28
comments powered by Disqus