सेनाच हलवणार शिवाजी पार्कवरचा बाळासाहेबांचा चौथरा...

By Shubhangi Palve | Last Updated: Friday, December 14, 2012 - 18:53

www.24taas.com, मुंबई
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरच्या चौथऱ्याचा वाद अखेर संपुष्टात येणार आहे. लवकरच विधिवत हा चौथरा शिवाजी पार्कवरून हटवण्यात येणार असल्याची भूमिका शिवसेनेनं घेतलीय.
शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुखांची अंत्यसंस्काराची जागा पूर्ववत करण्यात येणार आहे. शिवाजी पार्कवरील चौथरा विधिवत दूर करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिलीय. येत्या १७ डिसेंबरला शिवसेनाप्रमुखांच्या निधनाला एक महिना पूर्ण होतोय, त्याचदिवशी हा हिंदू प्रथा-परंपरेप्रमाणे चौथरा दूर करण्यात येईल, असं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. याबाबत शिवसेनेनं संबंधितांना पत्रदेखील पाठवलंय.

यावेळी सहकार्य दिल्याबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे आभार मानण्यात आलेत, तर महापालिका आणि पोलिसांचेही पत्राद्वारे आभार मानण्यात आलेत.

First Published: Friday, December 14, 2012 - 18:35
comments powered by Disqus