बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयी उद्धव ठाकरे देणार माहिती

शिवसेनाप्रमुखांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीविषयी उद्धव ठाकरे अधिक माहिती थोड्याच वेळात देतील. शिवसेना प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी अशी माहिती दिली.

Updated: Nov 15, 2012, 12:20 PM IST

www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुखांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीविषयी उद्धव ठाकरे अधिक माहिती थोड्याच वेळात देतील. शिवसेना प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी अशी माहिती दिली. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे शिवसैनिकांनी शांतता व संयम राखावा असाही सल्ला निलम गोऱ्हेंनी दिला आहे.
उद्धव थोड्याच वेळात माहिती देणार आहेत. शिवसेना अनेक नेत्यांनी बाळासाहेबांची भेट घेतली मात्र इतर कोणीही बोलण्यास तयार नव्हते. फक्त निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे अधिक माहिती देतील असे सांगितले. त्यामुळे अजूनही मातोश्री बाहेर शिवसैनिकांची गर्दी आहे.
दरम्यान काल रात्री उशीरा दोन वाजल्याच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी कलानगरच्या प्रवेशद्वाराशी येऊन शिवसैनिकांशी संवाद साधला होता. आम्ही आशा ठेवलीय, तुम्हीसुद्धा आशा कायम ठेवा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलं होतं.