आपला `देव` नक्कीच संकटातून बाहेर पडणार - उद्धव

आज दिवसभर शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत होतं. यावरच थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्वत: शिवसैनिकांशी संवाद साधत शिक्कामोर्तब केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 15, 2012, 11:27 PM IST

www.24taas.com, मुंबई
आज दिवसभर शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत होतं. यावरच थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्वत: शिवसैनिकांशी संवाद साधत यावर शिक्कामोर्तब केलंय.
‘कालपासून आजपर्यंत शिवसेनाप्रमुखांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. त्यामुळे मी काल जे बोललो तेच आजही सांगणार आहे... मी अजूनही आशा सोडलेली नाही. देवावर आमचा विश्वास आहे, देव त्यांना नक्की बरं करणार... आपण सगळे प्रार्थना करतोय, ही शक्ती नक्कीच आपल्या ‘देवाला’ संकटातून बाहेर काढणार’ असं स्पष्ट करत उद्धव ठाकरे यांनी कलानगर परिसरात उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं.
यावेळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते.