सातासमुद्रपार बाळासाहेब...

बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रात दबदबा होता. ठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक होते, त्यांचा महाराष्ट्राबरोबच खास करून मुंबईवर मोठा प्रभाव होता. बाळासाहेबांच्या निधनाची देशभरातील नाही तर जगभरातील मीडियाने दखल घेतली. श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, अमेरिका या देशातील प्रसारमाध्यमांनी बाळासाहेबांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध केले.

सुरेंद्र गांगण | Updated: Nov 19, 2012, 06:40 PM IST

www.24taas.com,मुंबई
बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रात दबदबा होता. ठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक होते, त्यांचा महाराष्ट्राबरोबच खास करून मुंबईवर मोठा प्रभाव होता. बाळासाहेबांच्या निधनाची देशभरातील नाही तर जगभरातील मीडियाने दखल घेतली. श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, अमेरिका या देशातील प्रसारमाध्यमांनी बाळासाहेबांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध केले.
गेली पाच दशके देशाच्याराजकारणात आपल्या ठाकरी शैलीने वादळ निर्माण करणाऱ्या बाळासाहेब यांच्या निर्वाणाची दखल देशी-विदेशी मीडियाने घेतली. बीबीसी, सीएनएन यासारख्या इंग्लंड, अमेरिकेतील माध्य समूहांसह पाकिस्तान, दुबई, श्रीलंका या देशांतील दैनिकांच्या पहिल्या पानावर वृत्त प्रसिद्ध केले होते.
बांग्लादेशमधून प्रसिद्ध होणाऱ्या ‘द डेली स्टार’ तर बीबीसीने मुंबईत कशी सुरक्षा व्यवस्था उभारली आहे, याची माहिती दिली तर सीएनएन या न्यूज चॅनेलने बाळासाहेब हे करिश्मा असलेले नेते होते. त्यांच्या समर्थकांमध्ये त्यांची गॉडफादर सारखी प्रतिमा होती. तसेच मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड होती, अशी माहिती दिली.
पाकिस्तानच्या डॉन या प्रमुख वृत्तपत्राने खास दखल घेतली. ठाकरे यांचे व्यक्तिमत्व वादग्रस्त होते. कट्टर हिंदूचे पुरस्कारकर्ते होते. शिवसेना या त्यांच्या पक्षाने बॉम्बेचे मुंबई असे नामकरण केलं होतं, असं म्हटलं आहे. तर दुबईहून प्रसिद्ध होणाऱ्या खलिज टाइम्स या वृत्तपत्राने The mascot of Marathi pride अशा आशयाचा लेख प्रसिद्ध केला आहे. तर वॉशिंग्टन पोस्टने म्हटेले आहे की, Hundreds of thousands attend funeral of India’s Hindu extremist leader Bal Thackeray.