देवाकडे पाठ करून का बसू नये?

मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आपण देवासमोर काही क्षण देवासमोर बसतो. नामस्मरण करतो. देवळात आपल्याला नेहमी सांगितलं जातं की देवाकडे पाठ करून बसू नये. यामागे नेमकं कारण काय आहे?

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 7, 2013, 05:58 PM IST

www.24taas.com, मुंबई
मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आपण देवासमोर काही क्षण देवासमोर बसतो. नामस्मरण करतो. देवळात आपल्याला नेहमी सांगितलं जातं की देवाकडे पाठ करून बसू नये. यामागे नेमकं कारण काय आहे?
देवाकडे पाहून आपण त्याचं जेव्हा नामस्मरण करतो, तेव्हा त्याचा आपल्यावर चांगला प्रभाव पड़त असतो. धार्मिक कारणांनुसार भगवंताकडे पाठ करून बसणं हा देवाचा अनादर केल्याप्रमाणे आहे. त्यामुळे देवाकडे पाठ करणं म्हणजे पावनतेकडे, त्याच्या आशिर्वादाकडे पाठ फिरवल्यासारखं असतं. हे अशुभ मानलं जातं.

ईश्वर सर्वत्र असला, तरी मंदिरात त्याची जी प्रतिमा असते, तिच्यासमोर बसल्यास अधिक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते. या प्रतिकाकडे पाठ करून बसणं देवाला अव्हेरल्याप्रमाणे असल्याचं पुराणात लिहिलं आहे. मात्र नास्तिक पंथाचे लोक आफला देवावर विश्वास नाही, हे दर्शवण्यासाठी मंदिरात प्रवेश करूनही देवाकडे पाठ करतात. त्यामुळे आपण नास्तिक नसल्याचं दर्शवण्यासाठी देवाच्या नजरेसमोर बसण्याची पद्धत आहे.