करा दिवसाची उत्तम सुरवात.....

दिवसाची उत्तम सुरवात झाली की, दिवसभर आपण आनंदी राहतो असं म्हणतात... त्यासाठीच www.24taas.com ने आपल्यासाठी खास बाप्पा आपल्या भेटीला आणले आहेत. गणपती बाप्पा मोरया.. चला तर करूया बाप्पांची आराधना....

Updated: Jul 7, 2012, 07:55 AM IST

www.24taas.com, मुंबई

दिवसाची उत्तम सुरवात झाली की, दिवसभर आपण आनंदी राहतो असं म्हणतात... त्यासाठीच www.24taas.com ने आपल्यासाठी खास बाप्पा आपल्या भेटीला आणले आहेत. गणपती बाप्पा मोरया.. चला तर करूया बाप्पांची आराधना.... 

|| श्री गणपती स्तोत्र ||

साष्टांग नमन हें माझें गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती।।1।।
प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते।
तिसरे कृष्णापिंगांक्ष चवथे गजवक्र तें।२।
पांचवे श्रीलंबोदर सहावेँ विकट नावं ते।
सातवे विघ्नराजेन्द्र आठवे धुम्रवर्ण तेँ।३।
नववेँ श्री भालचंद्र दहावेँ श्रीविनायक।
अकरावें गणपती बारावेँ श्रीगजानन।४।
देवनावेँ अशी बारा तीन संध्या म्हणे नर।
विघ्नभीति नसे त्याला प्रभो । तू;सर्वसिध्दि दे ।५।
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन। पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ।।६।।
जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ। एक वर्ष पूर्ण होता मिळे सिध्दि न संशय ।।७।।
नारदांनी रचिलेले झाले संपुर्ण स्तोत्र हे। श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिलेँ।।८।।

Tags: