what if tulsi plant dead - 24taas.com

घरातील तुळस सुकल्यास काय करावं?

घरातील तुळस सुकल्यास काय करावं?

www.24taas.com, मुंबई

तुळस ही आपल्या शास्त्रांमध्ये पवित्र मानली जाते. यामागे धार्मिक आणि शास्त्रीय कारणं आहेत. घराच्या आंगणात किंवा गॅलरीमध्ये तुळशीचे रोप असते. या रोपामुळे घरातील नकारात्मक शक्ती निष्प्रभ ठरतात. तुळस वातावरणातील किटाणू घालवण्याचं काम करते. घरातलं वातावरण पवित्र राखण्यात तुळशीच्या रोपाचा मोठा हात असतो.

मात्र जर तुळशीचं रोपटं सुकून गेलं, तर असं रोपटं घरात ठेऊ नये. एखाद्या नदीच्या पत्रात हे रोपटं सोडून द्यावं. याऐवजी तुळशीचे नवीन रोपटे घरात लावावं. सुकलेली तुळस ही वैद्यकीय दृष्ट्याही फायद्याची नसते आणि आध्यात्मिक दृष्ट्याही.

सुकलेल्या तुळशीचं रोपटं घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. घरातील प्रगतीवर याचा परिणाम होऊ शकतो. नकारात्मक शक्ती वाढीस लागतात आणि घरातील शांतता बिघधढण्यास सुरूवात होते. त्यामुळे असं तुळशीचं रोपटं घरात ठेवू नये. अशा रोपट्याची पूजाही करू नये. अशा रोपट्याटचं पाण्यात विसर्जन करावं आणि नवी तुळस लावावी.

First Published: Friday, August 17, 2012, 12:17


comments powered by Disqus