थोरा-मोठ्यांच्या पाया का पडावं?

देवाच्या तसेच ज्य़ेष्ठांच्या पाय पडण्याचा प्रघात भारतीय संस्कृतीत फार पूर्वीपासून आहे. मुळात देवाच्या पाया पडतो, तसं थोरा-मोठ्याच्या पाया का पडावं? यामागे काही मानसशास्त्रीय तसंच वैज्ञानिक कारणंही आहेत.

Updated: Jul 26, 2012, 03:38 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

देवाच्या तसेच ज्य़ेष्ठांच्या पाय पडण्याचा प्रघात भारतीय संस्कृतीत फार पूर्वीपासून आहे. वयाने, मानाने थोर असणाऱ्या व्यक्तींना देवसदृश मानून त्य़ांचा चरणस्पर्श केल्याने त्यांच्याशी असणारं नातं, आदर वाढतो. जेव्हा कुणी आपल्या पाया पडतं, तेव्हा त्या व्यक्तीस आशीर्वाद देणं तर आवश्यक असतंच, पण त्याचबरोबर देवाचं नामस्मरण करणंही आवश्यक असतं.

 

जेव्हा कुणी तुमच्या पाया पडतं, तेव्हा त्या व्यक्तीचे काही दोषही आपल्याला लागतात. या दोषांपासून मुक्ती मिळावी म्हणून मुखातून देवाचं नाव घेतलं जातं. यामुळे मनामध्ये पवित्र भाव निर्माण होऊन त्याचा सकारात्मक परिणाम होतो. पाया पडणाऱ्या व्यक्तीच्यातर समस्या दूर होतातच पण त्याचबरोबर त्याला दीर्घायुष्यही लाभतं.

 

मुळात देवाच्या पाया पडतो, तसं थोरा-मोठ्याच्या पाया का पडावं? यामागे काही मानसशास्त्रीय तसंच वैज्ञानिक कारणंही आहेत. अशा प्रकारे चरणस्पर्श केल्यामुळे त्यांच्यातील गुणही काही अंशी आपल्यात उतरतात. वाकून पाया पडण्याने शरीराला व्यायामही मिळतोच. चरणस्पर्श करण्याचे तीन प्रकार आहेत. वाकून नमस्कार करणं, गुडघे टेकूनवाकून नमस्कार करणं आणि साष्टांग दंडवत घालणं. या तीनही नमस्कारांच्या प्रक्रियेतून दोन शरीरं आणि भूमी यांच्यातील ऊर्जेची देवाण घेवाण होत असते. यातून शरीराला ऊपर्जा प्राप्त होतेच, मनात आदरभाव वाढतो आणि पाठीचा कणा, गुडघे यांचा व्यायाम होतो.