दृष्ट लागणं म्हणजे नेमकं काय?

Last Updated: Tuesday, July 24, 2012 - 20:02

www.24taas.com, मुंबई

 

आपल्याकडे दृष्ट लागणं हा एक धोका मानला जातो, घरातील अथवा व्यवहारातील काही अशुभ घटनांमागे दृष्ट लागणं हे कारण मानलं जातं. चांगल्या गोष्टी घडत असताना अचानक वाईट गोष्टी होण्यास सुरूवात होणे, सुखी कुटुंबात भांडणं होणं, अचानक आजारपण येणं या गोष्टींचा संबंध दृष्ट लागण्याशी असतो.

 

दृष्ट लागण्यापासून वाचण्यासाठी ज्योतिष शास्त्रात निरनिराळे उपाय सांगितले आहेत. लहान मुलांना दृष्ट लागू नये म्हणून काळा तीट लावतात. मीठ-मोहरीने दृष्ट काढतात. पण दृष्ट लागणं म्हणजे अंधश्रद्धा असा नव्हे. यामागेही काही शास्त्रीय कारणं आहेत. आपलं शरीर पंचतत्त्वांपासून मिळणाऱ्या ऊर्जेपासून चालतं. या पंचतत्त्वांपासून  सकारात्मक ऊर्जा मिळत असते. जेंव्हा दुसऱ्यांच्या नजरेतून या सकारात्मक ऊर्जेवर आघात होऊन नकारात्मक ऊर्जा आपल्यावर आघात करते, तेव्हा दृष्ट लागते. यामुळे आपल्याकडील सकारात्मक ऊर्जा कमी होते.

 

विज्ञानामध्ये काळा रंग हा उष्णतारोधक आहे असं सांगितलं आहे. त्यामुळे काळा दोरा नकारात्मक ऊर्जेला आपल्यापासून दूर ठेवतो. म्हणूनच वाईट नजर लागू नये,  यासाठी काळा दोरा बांधला जातो.

First Published: Tuesday, July 24, 2012 - 20:02
comments powered by Disqus