नाचे गणपती

गणपती ही सर्व शास्त्रांची देवता आहे. गणपती बुद्धिदाता आहे. कुठल्याही शुभकार्याची सुरूवात गणेश वंदनेने होते. इतकं गणपती देवतेचं महत्व आहे. गणपती हा असा देव आहे, ज्याची मूर्ती कुठल्याही रुपात मांडता येते. गणेशाची पूजा अनेक रूपांमध्ये केली जाते.

Updated: Jul 12, 2012, 04:51 PM IST

www.24taas.com, मुंबई

गणपती ही सर्व शास्त्रांची देवता आहे. गणपती बुद्धिदाता आहे. कुठल्याही शुभकार्याची सुरूवात गणेश वंदनेने होते. इतकं गणपती देवतेचं महत्व आहे. गणपती हा असा देव आहे, ज्याची मूर्ती कुठल्याही रुपात मांडता येते.   गणेशाची पूजा अनेक रूपांमध्ये केली जाते.

गणेशाच्या प्रत्येक रूपाचे वेगळे महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार दारवाज्याच्या वर गणेशाचे छायाचित्र लावणे शुभ असते. असे करण्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होऊ शकणार नाही. त्यामुळे आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर नेहमी गणपती विराजमान असतो.

वास्तुशास्त्रानुसार, घरात नृत्य करणा-या गणेशाचे छायाचित्र लावल्यास ते शुभ मानले जाते. गणेशाच्या नृत्यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा पसरते. घरातील वातावरण प्रसन्न होते. तसंच, नकारात्मक ऊर्जा स्वत:हून घराबाहेर जाते. नृत्य करणा-या गणेशाकडे बघून मन उत्साही होतेय. मनास शांती मिळते. घरात समृद्धी येते. घरात ज्या ठिकाणी आपली नजर नेहमी जाते, अशा ठिकाणी नृत्य करणा-या गणेशाची छायाचित्र लावावे. इतर कुठल्याही देवतेचे उभे अथवा अस्वस्थ अवस्थेतील म्हणजेच नृत्य करताना, चालत असताना इत्यादी हलचाली करत असतानाचे चित्र घरात लावत नाहीत. मात्र गणपती आणि हनुमान हे या बाबतीत आपवाद आहेत. गणपतीचे नृत्य वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.