रंगात रंगा... स्वभाव जाणा!!!!!

Last Updated: Sunday, December 25, 2011 - 14:33

झी २४ तास वेब टीम

 

रंग म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट असते. पण हेच रंग व्यक्तीचा स्वभाव दर्शवितात. ज्योतिष शास्त्रानुसार जसा आपला स्वभाव असतो तशीच आपली रंगाची आवड देखील असते. रंगांचा ग्रहांसोबत अगदी जवळचा संबंध असतो. आणि रंगांच्या आवडीनिवडी नुसार ग्रहांचा शुभ-अशुभ असा प्रभाव आपल्यावर पडत असतो.

 

ज्योतिष शास्त्रानुसार रंगाच्या आवडीनुसार आपल्याला आपला स्वभाव जाणून घेता येईल. पुढील पाच रंगांची नावे आहेत, त्यानुसार कोणता रंग आपल्याला आवडतो ते पाहा आणि त्यानंतर जाणून घ्या आपल्या आवडत्या रंगानुसार आपली स्वभाव वैशिष्ट:

 

रंग -  लाल, काळा, नीळा, हिरवा, पिवळा

या रंगामध्ये आपल्या आवडीच्या रंगानुसार जाणून घ्या आपला स्वभाव

 

रंगानुसार आपला स्वभाव

: लाल - आपण अतिशय सावध असणारे आणि सतर्क अश्या स्वभावाचे असता, आपल्या आयुष्यात प्रेमाला अतिशय महत्त्व असतं. आपण एक चांगले प्रेमी सिद्ध होऊ शकता.

 

: काळा - तुमचा स्वभाव रूढी आणि परंपरावादी असा असतो. आपल्याला खुप लवकर राग येतो. तुम्हांला बदल झालेले खूप कमी आवडतात.

 

: नीळा - आपण अतिशय स्वाभिमानी असणारे, कोणाची मदत घेणं आपल्याला फारसं आवडत नाही. आणि तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला पूर्ण वेळ देता.

 

: हिरवा - तुम्ही अतिशय शांतता प्रिय व्यक्ती असणार.  भांडण आणि वादविवाद यापासून दोन हात दूर राहणंच पसंत करता

 

: पिवळा - आपण नेहमी हसतमुख आणि प्रसन्न असे व्यक्तीमत्व असणारे असाल. दुसऱ्यांना नेहमी चांगलं मार्गदर्शन देणारे असाल. आणि सगळ्यांना मदत करण्यासाठी तत्पर असता.

 

ज्योतिष शास्त्रनुसार वरील रंगाच्या आवडीनुसार तुमचा स्वभाव असतो.  नऊ ग्रहांची वेगवेगळी स्थितीनुसार तुमच्या स्वभावात बदल हा होत असतो.

First Published: Sunday, December 25, 2011 - 14:33
comments powered by Disqus