संकटमोचन जय बजरंग

Last Updated: Friday, April 6, 2012 - 17:28

www.24taas.com, मुंबई

 

 

प्राचीन काळापासून प्रत्येक युगामध्ये हनुमानची पुजा आणि भक्ती करणाऱ्य़ांची मनोकामना जरूर पूर्ण होत आली आहे. शास्त्रीय आधारानुसार तीन युगे आहेत. आता कलीयुग सुरू आहे. ग्रंथाच्या आधारानुसार कलीयुगात देवाचे नाव घेतल्याने आपले पाप नष्ट होते. त्यासाठी पुजाअर्चा करण्याची गरज आहे. ही पुजाअर्चा केल्याने देवी-देवता प्रसन्न होतात.

 

 

आपल्यावरील संकट दूर करण्यासाठी हनुमान मदत करतो. ज्याच्यावर हनुमंत प्रसन्न होतो, त्याच्यावरील संकट तात्काळ दूर होते आणि सुख तसेच संपत्ती प्राप्त होते. हनुमंताचे अनेक विविध प्रकारात प्रतिमा उपलब्ध आहेत. शास्त्रीयआधारानुसार पुजेचे वेगळे महत्व सांगितले जाते. ज्याप्रकारच्या प्रतिमेंचे पुजन केले जाते, तसे प्रत्येकाला फळ मिळते. म्हणजेच हनुमान प्रसन्न होतो.

 

 

ज्याला धन आणि संपत्तीबरोबर सुख पाहिजे त्यांनी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांची आराधना करणाऱ्या हनुमानाची पुजा केली पाहिजे. वायुपुत्र भक्तीची प्रतिमा असलेल्या हनुमानाची पुजा केली असता हनुमान प्रसन्न होतो. तसेच श्रीराम, लक्ष्मण आणि सीता हेही प्रसन्न होतात. या देवतांच्या कृपेमुळे आपले संकट टळते शिवाय सौभाग्य प्राप्त होते. तंत्र ज्योतिषशास्त्रात अनेक चमत्कारिक उपाय सांगितले आहेत.  त्यापैकी एक उपाय आहे, जो केल्याने हनुमान स्वप्नात येऊन तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीचा आशीर्वाद देतील. हे अनुष्टान ८१ दिवसाचे आहे. हनुमान जयंती आज ६ एप्रिलला आहे, त्यामुळे या दिवसापासून या अनुष्ठानाची सुरुवात करावी.  

 

 

हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्य कर्म झाल्यानंतर, शुभ्र वस्त्र परिधान करा. एका तांब्यात पाणी घेऊन हनुमानाच्या मंदिरात जा आणि त्या पाण्याने हनुमानाच्या मूर्तीला अभिषेक करा. पहिल्या दिवशी उडदाची एक डाळ हनुमानाच्या डोक्यावर ठेऊन आकरा प्रदक्षिणा घाला, आणि मनातल्या मनात तुमची इच्छा हनुमानासमोर सांगा. नंतर उडदाची डाळ घरी घेऊन या, व वेगळ्या ठिकाणी ठेवा.

 

दुसर-या दिवशीपासून हीच प्रक्रिया करत राहा. ४१व्या दिवशी ४१ उडदाचे दाणे ठेऊन ४२ व्या दिवसापासून एक एक डाळ कमी करत जा. ८१ दिवसाहे हे अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर हनुमान स्वप्नात दर्शन देऊन तुमच्या इच्छापूर्तीचा आशीर्वाद तुम्हाला देतील.

 

 

आपल्या जीवनात समस्या येऊ नये असे वाटत असेल तर हनुमान मंत्राचा  जप तुम्ही दर मंगळवारी देखील करु शकता.  पुढीर मंत्र करा. - ऊँ नमो हनुमते रूद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा.

 
सकाळी लवकर उठून नित्यकर्म करून स्वछ कपडे घालून आई- वडिलांना आणि गुरूला नमस्कार करून आसनावर बसा.पारद हनुमानाच्या असलेल्या फोटो समोर बसून हा जप केल्याने विशेष फळाची प्राप्ती होण्यास मदत होते. जप करण्याकरता लाल रंगाच्या माळेच्या उपयोग करावा.First Published: Friday, April 6, 2012 - 17:28


comments powered by Disqus