दिवाळी आली, आपल्या घरातून काढून टाका या 8 वस्तू!

दिवाळी अवघी एका दिवसावर आलीय. उद्या धनत्रयोदशी आहे. जवळपास सर्वांकडील साफसफाई झाली असेल. पण तरीही घरात अशा काही वस्तू असतात ज्या कोणत्या कोपऱ्यात पडलेल्या असतात... त्याचा वाईट परिणाम घरावर होऊ शकतो. 

Updated: Nov 8, 2015, 03:58 PM IST
दिवाळी आली, आपल्या घरातून काढून टाका या 8 वस्तू! title=

मुंबई: दिवाळी अवघी एका दिवसावर आलीय. उद्या धनत्रयोदशी आहे. जवळपास सर्वांकडील साफसफाई झाली असेल. पण तरीही घरात अशा काही वस्तू असतात ज्या कोणत्या कोपऱ्यात पडलेल्या असतात... त्याचा वाईट परिणाम घरावर होऊ शकतो. 

आणखी वाचा - धनत्रयोदशीच्या दिवशी शॉपिंग करण्याचा बेस्ट मुहूर्त...

11 तारखेला असलेल्या लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रामध्ये काही वस्तूंबाबत सांगण्यात आलंय. या वस्तूंमुळे आर्थिक कामांमध्ये अडचण निर्माण होते आणि त्याचा परिणाम लक्ष्मीच्या कृपेवर होऊ शकतो. 

तेव्हा जाणून घ्या या 8 वस्तू कोणत्या... त्या त्वरीत घरातून काढून टाका-

1) अनेक लोक घरामध्ये तुटकी-फुटकी भांडी ठेवतात, जे अशुभ प्रभाव देतात. शास्त्रानुसार घरामध्ये फुटलेले, तडा गेलेले भांडे ठेवू नयेत. असे भांडे घरामध्ये ठेवल्यास महालक्ष्मीची अवकृपा होते. तसंच दरिद्रता आपल्या घरामध्ये प्रवेश करते. या भाड्यांमुळं वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुदोष निर्माण झाल्यास नकारत्मक फळ प्राप्त होऊ लागतात.

2) फुटलेला आरसा
फुटलेला आरसा घरामध्ये असणं हा वास्तुशास्त्रानुसार एक दोष आहे. या दोषामुळं नकारात्मक उर्जा सक्रिय होते आणि कुटुंबातील सदस्यांना नकरात्मक परिणामांना सामोरं जावं लागतं.

3) तुटलेला पलंग
वैवाहिक जीवनात सुख-शांती राहण्यासाठी पती-पत्नीचा पलंग तुटलेला नसावा. जर पलंग तुटलेला असेल तर वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात.

4) खराब घड्याळ
खराब, बंद पडलेली घड्याळ घरामध्ये ठेवू नये, असं मानलं जातं की, घड्याळांच्या स्थितीनुसार आपल्या घराची उन्नती निश्चित होते. घरामधील घड्याळ व्यवस्थित नसल्यास कुटुंबातील सदस्यांना काम पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होतील आणि काम वेळेवर पूर्ण होणार नाही.

5) घरामध्ये एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब किंवा तुटलेली असेल तर, अशी वस्तू घरामधून काढून टाकावी, असं सामान घरामध्ये ठेवल्यास वास्तुदोष उत्पन्न होतो.

6) घरामध्ये एखादी फोटो फ्रेम तुटलेली असेल तर, अशी फ्रेम घरामधून काढून टाकावी. वास्तुनुसार हा एक वास्तुदोष आहे.

7) घराचा मुख्य दरवाजा किंवा इतर रुमचं दार तुटलेलं असेल तर, असे दरवाजे लगेच व्यवस्थित करून घ्यावेत. दरवाजामध्ये तुट-फूट असल्यास वास्तुदोष निर्माण होतो.

8) घरातील फर्निचर व्यवस्थित असावे. वास्तुनुसार फर्निचरमध्ये तुट-फूट अशुभ मानली जाते. घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाल्यास कुटुंबातील सदस्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. ज्या घरामध्ये वास्तुदोष असतो त्याठिकाणी पैशांची कमतरता राहते.

आणखी वाचा -  अचानक धन पाहिजे तर लक्ष्मीच्या १८ पूत्रांचे नाव घ्या

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.