ग्रहांचा परिणाम मानवी मनावर....

नवग्रहांतील प्रत्येक ग्रहाचे जसे वैशिष्ट्य आहे तसे त्यांच्या परस्परयुतींचेदेखील वैशिष्ट्य आहे. विशेषतः चंद्र ग्रह हा पृथ्वीचा उपग्रह आहे.

Updated: Feb 12, 2013, 08:37 AM IST

www.24taas.com
नवग्रहांतील प्रत्येक ग्रहाचे जसे वैशिष्ट्य आहे तसे त्यांच्या परस्परयुतींचेदेखील वैशिष्ट्य आहे. विशेषतः चंद्र ग्रह हा पृथ्वीचा उपग्रह आहे. मानवी मनाचा तो कारक आहे. मनामध्ये निर्माण होणारे विचार, सुखदुःख आदींची कल्पना ह्या ग्रहाच्या स्थितीवरून होऊ शकते.
मनामध्ये येणार्‍या असंख्य विचारांपैकी काहींचे परिवर्तन हे आपल्या विचाराअंती होणार्‍या निर्णयामध्ये होऊ लागते. मानवी जीवनामध्ये आपण जे जे काही करतो वा करण्याचे टाळतो ते सर्व आपल्या मनाने, बुद्धीने घेतलेल्या निर्णयादाखल असतात. आत्म्यावर झालेले शापित संस्कार कसे असतात, हे जन्मपत्रिकेवरूनदेखील समजतात. काही पत्रिका शापमुक्त असतात. ग्रंथात एकूण ८ शाप सांगितले आहेत.
१. सर्पशाप, २. पितृशाप, ३. मातृशाप, ४. भ्रातृशाप, ५. मातृलशाप, ६. ब्रह्मशाप, ७. पत्नीशाप व ८. प्रेतशाप.
वरील शापांचे ज्योतिषाच्या आधारे विवरण देत आहे. ज्याच्या जन्मकुंडलीत राहूमुळे पंचम स्थान दूषित झाले असेल, पंचमेश अथवा गुरू व राहूचे युतीत असेल, पंचम स्थानावर, तसेच गुरूवर पापग्रहाची दृष्टी व राहू गुरूच्या धनू, मीन राशीत असेल किंवा खालील योग असतील त्याने संततिसौख्य व पुत्रप्राप्तीसाठी ‘नारायणबली’ व ‘नागबली’ करावा.