पहा काय आहे तुमच्या नोकरीस घातक

Last Updated: Wednesday, April 3, 2013 - 09:34

www.24taas.com
नोकरीमध्ये बऱ्याचदा आपल्याला यश मिळत नाही. अनेकदा मानसिक तणावाखाली आपण वावरत असता. आणि त्यामुळे नोकरीतील आपले चित्त अस्थिर असते. आपले कर्म क्षेत्र व्यापार, उच्च नोकरी, राजकारण, उच्चपद या गोष्टी सू्र्याच्या स्थानावर अवलंबून असतात.
सूर्य अशुभ असेल तर आपल्याला वडिलधार्‍यांचा आधार मिळत नाही. राजकारणात नेहमी अपयश मिळते. व्यापार अथवा नोकरीत कधी न सुटणार्‍या अडचणी निर्माण होतात. कुंडलीत जर सूर्य व शनि सोबत असतील तर त्या घरात वडील व मुलगा यांच्यात नेहमी खटके उडत असतात. सूर्यासोबत राहू आल्यास पितृदोष असून तो प्रत्येक शुभकार्यात अडचणी निर्माण करणारा असतो.
सूर्य- चंद्राची स्थिती अमावस्या योग असल्याने जातकाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शनीची सूर्यावर वक्रदृष्टी असते. श्रेष्ठ सूर्य प्रत्येक क्षेत्रात फळ देणारा असतो.

First Published: Wednesday, April 3, 2013 - 09:34
comments powered by Disqus