अडगळ ठरवते तुमची सुख-संपदा..

Last Updated: Friday, April 12, 2013 - 18:03

www.24taas.com
घरातील भंगार सामानही कधी लागेल ते सांगता येत नाही. म्हणून ते टाकूनही देता येत नाही. घरातील हे सामान कुठे आणि कसे ठेवले आहे याचा परिणाम घरातल्यांच्या जीवनावरही होतो.
* पूर्व : ह्या दिशेला असणार्‍या भंगार सामानामुळे घरमालकाला काही अघटित घटनांना तोंड द्यावे लागते.
* आग्नेय : आग्नेयला असणार्‍या भंगारामुळे कर्त्या व्यक्तीची मिळकत खर्चापेक्षा कमी होण्यामुळे त्याला कर्ज होते.
* दक्षिण : इथल्या बेडरूममध्ये भंगार भांडी, लाकडी सामान, माठ वगैरे ठेवल्यास मालकाच्या भावांना अडचणी व अडथळे येतात. घरमालकाच्या बोलण्यात गर्व व अहंकार दिसतो व पुढे तो जर्जर होऊन कष्टी होतो.
* नैऋत्य : घरात भंगार ठेवण्याची योग्य जागा पण तिथे ओलावा नसावा व योग्य प्रकाशही असावा.
* ज्या घरात भंगार ठेवण्याची खोली इतर खोल्यांपेक्षा मोठी व अंधारी असते तेथील लोकांचे इतरांशी शत्रुत्व निर्माण होते.
* पश्चिम : जुन्या वस्तू ठेवल्याने, दरवाजे-खिडक्या तुटलेल्या अवस्थेत ठेवल्यास, भिंती खराब असल्यास तेथे राहणार्‍या
लोकांची कामे विलंबाने होतात. फसवणूक व लूटमारीतून उत्पन्न मिळवलेले असल्यास कर्ता पुरुष वाईट लोकांच्या संगतीत राहतो व घरात नेहमी वाद होतात व त्यावर दोषारोपही होतात.
* वायव्य : या ठिकाणी भंगार ठेवल्यास कर्त्याला मित्रांशी शत्रूत्व येते, मानसिक तणावाने मन विचलित होते तसेच त्याच्या आईला कफाचा व वाताचा त्रास संभवतो. या स्थितीवरून असेही लक्षात येते, की घराचा कर्ता पुरुष खूप लांबून येऊन इथे राहत आहे.
* उत्तर : इथे भंगार ठेवल्यास कर्त्या पुरूषाला बंधुसुख नसून सर्वांत धाकटा भाऊ विक्षिप्त असू शकतो.
* ईशान्य : इथे भंगार ठेवल्याने घरातले लोक नास्तिक होतात. त्यांना संधीवाताचा त्रास संभवतो.
* घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या हाताच्या खोलीत भंगार ठेवल्यास त्या घरच्या स्त्रीला डोळ्यांचा त्रास होतो पती पत्नी संबंध व सहयोग यथातथाच असतो.



First Published: Friday, April 12, 2013 - 17:56


comments powered by Disqus