ऑफिसमध्येही मिळवा सकारात्मक ऊर्जा...

ऑफिस ही एक अशी जागा आहे जेथे आज काल लोक घरापेक्षा जास्त वेळ घालवतात. पण, ऑफिसच्या कामाचा तणाव, सहकाऱ्यांशी वादविवाद आणि स्पर्धा यांमध्ये तुमचा दिवस जात असेल तर तुमचं कामात कधीच लक्ष लागू शकणार नाही.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 17, 2013, 08:19 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ऑफिस ही एक अशी जागा आहे जेथे आज काल लोक घरापेक्षा जास्त वेळ घालवतात. पण, ऑफिसच्या कामाचा तणाव, सहकाऱ्यांशी वादविवाद आणि स्पर्धा यांमध्ये तुमचा दिवस जात असेल तर तुमचं कामात कधीच लक्ष लागू शकणार नाही. आपसूकच पाय एकमेकांचे पाय खेचण्याच्या स्पर्धेत तुम्हीही ओढले जाल. पण, सगळ्या वातावरणापासून वेगळं राहून आपलं स्थान निर्माण करायचं असेल तर तुमच्या टेबलवरच सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची गरज आहे.
आपण पूर्ण ऑफिसची वास्तू तर बदलू शकत नाही पण आपल्या ऑफिसच्या टेबलचा वास्तू तर ठीक करूच शकतो. टेबलाला वास्तूच्या अनुरूप ठेवणे जरूरी आहे कारण त्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. पाहा, फेंगशुईमध्ये काय काय उपाय दिलेत तुम्हाला तुमचा टेबल सजवून सकारतात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी :-
> टेबलावर फेंगशुईचा क्रिस्टल ग्लोब जरुर ठेवून त्याला दिवसातून तीन वेळा फिरवायला पाहिजे. याने तुम्हाला काम करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळेल.
> टेबलाची दिशा अशी हवी की पाठ भिंतीकडे असली पाहिजे.
> टेबलावर हिरवा, पांढरा किंवा कुठल्याही हलक्या रंगाचा टेबल क्लाथ टाकायला पाहिजे. लाल, काळे असे रंगांचा प्रयोग टाळला पाहिजे.
> भिंतीकडे मोठं मोठे पर्वत असलेले चित्र लावायला पाहिजे.
> ऑफिसमध्ये डेस्कला असे ठेवायला पाहिजे की तो सरळ दाराकडे नसावा.
> ऑफिस टेबलावर उत्तरामध्ये चहा किंवा कॉफीचे कप ठेवायला पाहिजे.
> टेबलाच्या पूर्वो-उतर दिशेकडे क्रिस्टलचे पेपरवेट ठेवायला पाहिजे.
> कम्प्युटरला नार्थ-वेस्टमध्ये ठेवायला पाहिजे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.