घरात पैसा टिकत नसल्यास हे उपाय करा

मुंबई : पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभार काम करतो.

Updated: Feb 27, 2016, 02:33 PM IST
घरात पैसा टिकत नसल्यास हे उपाय करा title=

मुंबई : पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभार काम करतो. पण, कधीकधी काही केल्या कष्टाने कमावलेला हा पैसा घरात टिकत नाही. काही वेळा पैसा ठेवण्याच्या जागेत दोष असू शकतो. खाली दिलेले काही सोपे उपाय करा आणि तुम्ही कमावलेला हा पैसा घरात टिकवा.

- घरात तिजोरी ठेवण्याची जागा फार महत्त्वाची आहे. तुम्ही कोणत्या जागी तिजोरी ठेवता यावर फार काही निर्भर आहे. तिजोरी योग्य जागी ठेवल्यास धनाची वृद्धी होऊ शकते.
घराच्या उत्तकेडील भागाला कुबेराचं स्थान मानलं जातं. म्हणूनच तिजोरी ठेवण्याची खोली ही उत्तरेकडील असावी. जर कपाटात धन ठेवायचे असले तर ते मधल्या किंवा वरच्या कप्यात ठेवावे.

- तिजोरी ठेवलेली खोली चौरस किंवा आयताकृती असावी. त्याचसोबत तिजोरीच्या समोर कसलाही फोटो लावला जाऊ नये. त्याच्या आजूबाजूच्या भिंतींवर हवे तर फोटो लावू शकता.

- तिजोरी असलेल्या खोलीला एकच प्रवेशद्वार असावं. हे प्रवेशद्वार खासकरुन उत्तर किंवा पूर्व दिशेने असणं केव्हाही उत्तम. दक्षिण दिशेला कोणतंही प्रवेशद्वार नसावं, याची काळजी घेणं मात्र फार जरुरी आहे.

- तिजोरी असणाऱ्या खोलीच्या प्रवेशद्वारावर कमळात विराजमान असणारी आणि सफेद हत्तींकडून अभिषेक होत असणाऱ्या लक्ष्मीचा फोटो असावा. यामुळे घरात संपत्तीची नेहमी वाढ होत राहील.

- तिजोरीत कोणत्याही प्रकारचे अत्तर किंवा इतर कोणतीही गोष्ट ठेवू नये. त्याचप्रमाणे तिजोरीच्या वर कपडे, फाईल्स किंवा इतर कोणतीही वस्तू ठेवू नये. तिजोरीच्या आत लाल रंगाचा कपडा ठेवणे शुभ मानले जाते.

- तिजोरीखालील जमीन ही समांतर असावी. ही जमीन खडबडीत असल्यास दगड किंवा इतर काही गोष्टी ठेवून ती सरळ करावी.

- तिजोरी असणाऱ्या खोलीचा रंग फिकट पिवळा असावा. तिजोरी ठेवण्याच्या खोलीला लाल, हिरवा, निळा रंग देऊ नये. तिजोरी त्या खोलीत स्थापन करण्याचा दिवस सोमवार, बुधवार किंवा गुरुवार असावा.