सकाळ फ्रेश तर दिवस तुमचा!

By Shubhangi Palve | Last Updated: Thursday, May 16, 2013 - 08:15

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पहाटे पहाटे उठताना आळस झटकून एकदम फ्रेश किती जण उठत असतील बरं... खरं तर हा सकाळची सुरुवात फ्रेश झाली की दिवस त्याच पद्धतीने आनंदात जातो... एकदम फ्रेश! पण सकाळी सकाळी डोळ्यांवरून झोपच हटत नाही! होय ना? पण, आपल्याला जर आपला संपूर्ण दिवस योग्य पद्धतीनं आनंदात जावा असं वाटत असेल तर काही उपाय करून बघायला काय हरकत आहे!
आपल्या सकाळची सुरुवात चांगली व्हावी यासाठी शास्त्रही आपल्याला मदत करतं. पाहुयात काय काय उपाय सांगण्यात आलेत शास्त्रात यासाठी... आणि हो, हे उपाय अंथरूण सोडण्यापूर्वीच अंमलात आणायचेत बरं का. यामुळे देवी लक्ष्मी (समृद्धी) आणि देवी सरस्वतीची (ज्ञान) कृपा तुमच्यावर कायम राहिल.
> सकाळी उठल्यानंतर अनेक लोक पहिल्यांदा देवाचे दर्शन घेतात तर काही लोक कुटुंबातील सदस्यांचा चेहरा पाहतात. असे म्हणतात की, सुरुवात चांगली असेल तर सर्व काही चांगले होते.
> सकाळी झोपेतून उठल्यानंतर अंथरून सोडण्यापूर्वी आपल्या हातांचे दर्शन करावं. शाळेत आपण सगळ्यांनीच म्हटलेला मंत्र तुमच्य लक्षात असेलच...
कराग्रे वसति लक्ष्मी: करमध्ये सरस्वती । करमूले तू गोविंद: प्रभाते करदर्शनम्॥
म्हणजेच, सकाळी उठल्यानंतर हातांचं दर्शन घ्यावं, कारण आपल्या हातामध्येच लक्ष्मी वसलेली आहे. हाताच्या मध्यभागामध्ये सरस्वतीचा आणि मूळभागामध्ये विष्णूचा वास असतो. यामुळे प्रातःकाळी दोन्ही हातांचे दर्शन घ्यावे. सुख-शांतीसोबतच धन पूर्ती कायम राहण्यासाठी आपल्या हाताचं दर्शन घेतलं जातं.
> हातांचे दर्शन करत मंत्रजप झाल्यानंतर दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवावेत. प्राचीन ऋषी-मुनी यांच्यानुसार असे मानले जातं की, आपल्या हातामध्ये दैवी शक्तींचा निवास असतो. यामुळे दिवसभरासाठी उर्जा प्राप्त होते. जे लोक नियमित सकाळी हे काम करतात त्यांच्या डोळ्यांची नजर कमी होत नाही. चष्मा लावण्याची गरज नाही आणि जर चष्मा असेल तर त्याचा नंबर कमी होण्याची शक्यता वाढते. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी सकाळी हात डोळ्यांवरून फिरवणे लाभदायक ठरते.
या कारणामुळे सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिले आपल्या हातांचे दर्शन घ्यावे. असे केल्यास दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि दिवसभर कामामध्ये यश प्राप्त होईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Thursday, May 16, 2013 - 07:55


comments powered by Disqus