लवकर विवाह होण्यासाठी...

आजच्या काळात मनासारखा जोडीदार मिळण्यास अनेक समस्या येतात. बऱ्याचवेळा लग्नाचं वय निघून जातं, तरीही विवाह जमत नाही. या गोष्टीची सर्वाधिक चिंता मुला-मुलींच्या आई वडिलांना असते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 28, 2012, 04:08 PM IST

www.24taas.com, मुंबई
आजच्या काळात मनासारखा जोडीदार मिळण्यास अनेक समस्या येतात. बऱ्याचवेळा लग्नाचं वय निघून जातं, तरीही विवाह जमत नाही. या गोष्टीची सर्वाधिक चिंता मुला-मुलींच्या आई वडिलांना असते.

आपलं लग्न लवकरात लवकर जमावं आणि आपल्याला चांगला जोडीदार मिळावा, यासाठी अत्यंत सोपा उपाय ज्योतिषशास्त्रात दिला आहे. हा तोडगा वापरल्यास तुम्हाला लवकर चांगलं स्थळ मिळेल, अनुरूप जोडीदार मिळेल.
दर गुरूवारी पाण्यामध्ये एक चतुर्थांश चमचा हळद किंवा शक्य झाल्यास केशर घालून अंघोळ करा. तसंच गुरूवारी गायीला पीठ खायला घालून त्यात थोटी हळद, गूळ आणि भिजलेली चणा डाळ खायला घालावी. यामुळे तुमचा लवकर विवाह होतो.