१२ अंक आणि भारतात महत्त्व

१२ हा जुन्या लोकांचा फार प्रिय अंक. मोजण्यासाठी जशी दशमान पध्दती लोकप्रिय तशीच द्वादशमान पध्दतीही.

Updated: Apr 24, 2015, 01:08 PM IST
१२ अंक आणि भारतात महत्त्व  title=

मुंबई : १२ हा जुन्या लोकांचा फार प्रिय अंक. मोजण्यासाठी जशी दशमान पध्दती लोकप्रिय तशीच द्वादशमान पध्दतीही.

- आपण एक फूट म्हणजे १२ इंचाची पट्टी वापरतो.

- एक डझन म्हणजे १२ नग. 

- एक वर्ष १२ महिन्यांचे.

- आकाशातले नवग्रह १२ राशीतून फिरतात. बारावा गुरू, शनि, मंगळ हानिकारक समजले जातात. 

- पूर्वी तपश्चर्या १२ वर्षे करीत. 

- गुरूगृही अध्ययनही १२ वर्ष चाले.

- घड्याळात आकडे बारा.पूर्ण दिवस जरी २४ तासांचा असला तरी आपण त्याचे १२/१२ तासांचे विभाजन केले आहे मध्यानपूर्व व मध्यान्हनंतर असे.पूर्वी रात्रीचे १२ वाजले म्हणजे  मध्यरात्र झाली असे समजत.

- एखादी गोष्टीचा निकाल लागला म्हणजे त्याचे १२ वाजले असे म्हणतात.

- गावात...शहरात सकाळी भरलेला बाजार साधारण १२ वाजता उठतो त्यावेळी राहिला उरला सुरला माल स्वस्त दरात विकण्यात येतो म्हणून एखादी वस्तू कमी किमतीला काढून टाकायची असेल तर ती १२ च्या भावात काढून टाका असा शब्दप्रयोग आहे.

- पूर्वीच्या काळी १२ व्या वर्षी मुलगी वयात आली असे समजत असत.

- पू्र्वी भारतात १२ पैशांचा एक आणा होत असे आणि इंग्लंडमध्ये १२ पेन्सचा १ शिलींग.

- नवीन जन्मलेल्या अपत्याचे नामकरण १२ व्या दिवशी करतात त्याला बारसे म्हणतात.

- तसेच मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांनी करतात, त्यास बारावे असे म्हणतात.

- पूर्वी १२ बलुतेदार, बाराभाई, बारावाटा, बाराबंगले इ.शब्दप्रयोग उपयोगात होते.

- एखाद्या बेरकी आणि चालू माणसाला १२ गावचं पाणी प्यायलेला आहे असं म्हणत असत.

- भारतात १२ ज्योतिर्लिंगे प्रसिध्द आहेत.

- मराठी भाषेच्या वर्णमालेत स्वर १२ आहेत त्यावरूनच बाराखडी म्हणण्यात येते.

- अजुनही उत्तर भारतात १२ गावचा मुखिया (सरपंच) असतो.

- जमीन मालकाचा सरकार दफ्तरी असलेला पूरावा म्हणजेच ७/१२ चा उतारा.....

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.