नखांवरील डाग पहा काय होतात बदल...

Last Updated: Friday, January 4, 2013 - 11:40

www.24taas.com, मुंबई
मनुष्याच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडत असतात. त्यामुळे भविष्यात काय होणार याबाबत नेहमीच प्रत्येकजण उत्सुक असतात. अनेक गोष्टी तुमच्यावर परिणाम करीत असतात. तुम्हाला माहित आहे का नशीब बदलणार असेल तर तुमच्या नखावर काही खुणा तयार होतात. जर तुम्ही भविष्यात घडणाऱ्या गोष्टी जाणून घेऊ इच्छिता तर लक्षपूर्वक आपल्या नखांचे परीक्षण करा. तुम्हाला सहज समजेल की तुमच्या नशिबात काय लिहले गले आहे.
पहिल्या बोटाच्या नखावर पांढरा डाग असेल तर तुम्ही केलेल्या कामात तुम्हाला फायदा होणार आहे.
जर तुमच्या बोटाच्या नखावर चंद्रासारख्या आकाराचे चिन्ह असेल तर तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. यांत्रिक गोष्टीपासून तुम्हाला लाभ होऊ शकतो.
करंगळीच्या नखावर जर छोटा डाग असेल तर तुम्हाला धनलाभ होणार आहे. तुम्ही ठरवलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत.
अंगठ्याच्या नखावर पांढरा डाग असेल तर तुम्हाला प्रेमात यश मिळणार आहे.

First Published: Friday, January 4, 2013 - 08:16
comments powered by Disqus