चुकूनही एकादशीच्या दिवशी या वस्तूंचे सेवन करु नका

भगवान विष्णूच्या व्रतापैकी एकादशीचे व्रत महत्त्वपूर्ण मानले जाते. एकादशी वर्षातून १४ वेळा येते. शास्त्रानुसार, या दिवशी उपवास केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. 

Updated: Jun 16, 2016, 10:15 AM IST
चुकूनही एकादशीच्या दिवशी या वस्तूंचे सेवन करु नका title=

मुंबई : भगवान विष्णूच्या व्रतापैकी एकादशीचे व्रत महत्त्वपूर्ण मानले जाते. एकादशी वर्षातून १४ वेळा येते. शास्त्रानुसार, या दिवशी उपवास केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. 

एकादशीच्या दिवशी विशिष्ट पदार्थांचेच सेवन केले जाते. मात्र शास्त्रात या दिवशी काही पदार्थांचे सेवन वर्ज्य करण्यास सांगितले आहे. 

१. यादिवशी तांदळाचे सेवन करु नये. एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये.

२. तांदळाप्रमाणेच बार्लीचेही सेवन करु नये. 

३. एकादशीच्या दिवशी लसूण, कांदा यांचेही सेवन वर्ज्य आहे. 

४. एकादशी आणि द्वादशीला वांगी खाऊ नये.

५. मांसमच्छी आणि दारुचेही सेवन या दिवशी टाळावे.