बेडरुममध्ये या ५ गोष्टी ठेवणे कटाक्षाने टाळा

वास्तुशास्त्रात घरातील विविध खोल्यांचे महत्त्व वेगवेगळे सांगितले आहे. पूजा घर, किचन, हॉल, बेडरुममध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात, नसाव्यात याचे नियम आहेत. इतर खोल्यांप्रमाणेच बेडरुममध्ये कोणत्या गोष्टी ठेवू नयेत, कोणत्या गोष्टी कुठे ठेवाव्यात याची माहिती असते. याचे पालन केल्यास जीवनात आनंद येईल. 

Updated: Jan 29, 2016, 11:35 AM IST
बेडरुममध्ये या ५ गोष्टी ठेवणे कटाक्षाने टाळा title=

मुंबई : वास्तुशास्त्रात घरातील विविध खोल्यांचे महत्त्व वेगवेगळे सांगितले आहे. पूजा घर, किचन, हॉल, बेडरुममध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात, नसाव्यात याचे नियम आहेत. इतर खोल्यांप्रमाणेच बेडरुममध्ये कोणत्या गोष्टी ठेवू नयेत, कोणत्या गोष्टी कुठे ठेवाव्यात याची माहिती असते. याचे पालन केल्यास जीवनात आनंद येईल. 

ज्या बेडवर तुम्ही झोपता तेथील चादरी, उशांची अभ्रे साध्या डिझाईनची असावीत. अधिक डिझाईन अथवा रंगीबेरंगी चादरी, अभ्रे वापरु नयेत. 

बेडरुममध्ये हल्का गुलाबी रंगाचा प्रकाश असावा. यामुळे पती-पत्नीत एकमेकांबद्दल प्रेमभावना जागृत राहते. 

बेडरुममध्ये ड्रेसिंग टेबल असल्यास बेडच्या समोर ठेवू नये. 

झोपताना कधीही घड्याळ डोक्याच्या अथवा उशीच्या खाली ठेवू नये. ते बेडच्या उजव्या अथवा डाव्या बाजूला ठेवावे. 

आपल्या बेडरुममध्ये कोणत्याही देवतेचा अथवा पूर्वजांचा फोटो लावू नये.