साष्टांग दंडवत का घालावं?

By Jaywant Patil | Last Updated: Wednesday, November 7, 2012 - 16:40

www.24taas.com, मुंबई
आपण मंदिरात गेल्यावर प्रथम घंटानाद करतो. त्यानंतर गाभाऱ्यातील देवाचं मनोभावे दर्शन घेऊन देवाला नमस्कार करतो. प्रदक्षिणा घालतो. पण बऱ्यावेळेला लोक देवाला साष्टांग नमस्कार करत नाहीत. देवाला नेहमी साष्टांग दंडवत घालावा.

देवाला साष्टांग दंडवत घालण्यामागे अनेक धार्मिक, अध्यात्मिक आणि शास्त्रीय कारणं आहेत. साष्टांग नमस्कारामुळे शरीराला व्यायाम मिळतो हे एक शारीरिक कारण तर आहेच. पण साष्टांग नमस्कारामुळे आपण देवापुढे पूर्णपणे नतमस्तक होतो. आपल्या मनातील अहंकार दूर होतो. जमिनीवर पूर्णपणे आडवं झाल्यामुळे आणि विशेषतः जमिनीकडे तोंड असल्यामुळे काही क्षणांपुरता आपला आसपासच्या घडामोडींशी संपर्क तुटतो.
योग्य पद्धतीने साष्टांग नमस्कार करण्याची ठराविक पद्धत आहे. देवासमोर पालथं पडून पोटावर जमिनीला टेकावं. दोन्ही हातांना डोक्याच्यावर नेऊन दंडवत करावा. यामुळे आपल्या शरीराची कपाळ, छाती, हात, पाय, गुडघे अशी आठ अंगं जमिनीशी जोडली जात असतात. शरीरावर ताणही पडत असतो, मात्र शांतही वाटत असतं. अशा प्रकारे साष्टांग नमन केल्यास मन शांत होतं आणि एकाग्र होतं.

First Published: Wednesday, November 7, 2012 - 16:40
comments powered by Disqus