बाळाचे नाव ठेवण्याआधी हे करा?

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, March 27, 2013 - 19:15

www.24taas.com,मुंबई
विल्यम्स् सेक्सपिअर म्हणाला होता, नावात काय आहे?..पण सर्व काही नावात आहे, याची प्रचिती येते. आपले नाव आपल्या हातात नसले तरी आपल्या बाळाचे नाव काय ठेवावे, याचा विचार केला पाहिजे. नावावरून त्या बाळाचे भवितव्य ठरते. चांगले नाव बाळाची प्रगतीसाठी चांगले असते. त्यामुळे नाव ठेवताना नेहमी काळजी घेतली पाहिजे.
बाळाचे नावे नाव राशीवरून ठेवण्याची आजही प्रथा आहे. त्यासाठी एक अक्षर काढले जाते. त्या अक्षरावरून नाव ठेवले जाते. बाळाचे नाव ठेवताना जास्तीत जास्त काळजी घेण आवश्यक आहे. पालकांनी नाव ठेवण्याआधी त्यातील बहुतेक पर्याय लिहून काढावेत आणि काय टाळाव, याबाबत माहिती जाणून घेतली पाहिजे.
बाळाचं नाव ठेवण्याआधी त्याच्या राशी चार्ट, लग्न राशीनुसार, जन्म तिथीनुसार, भाग्यांकानुसार, अंकशास्त्रानुसार नाव ठेवणं, हे त्या व्यक्तीसाठी नेहमीचं चांगलं असते. एक चांगल नाव त्या मुलाचं चांगलं शिक्षण, शारीरिक वाढ, विकास आणि पुढे जाऊन चांगल्या आरोग्यदायी भविष्यासाठी उपयोगी ठरत असते. त्यामुळे नाव ठेवण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे.

नावाच्या अक्षराबाबत, व्याकरण तसेच स्पेलिंगबाबत सतर्क किंवा जागृत असले पाहिजे. चुकीच्या नावामुळे तुमच्या आयुष्यात संकट येऊ शकते. बाळाचे नाव ठेवताना जास्तीत जास्त काळजी घेण आवश्यक आहे. वडिलांचं नाव लावण किंवा न लावण हे सुद्धा निर्णायक ठरू शकत. बऱ्याच वेळा माहिती न घेता पालकांच्या अजाणतेपणी चुकीचं नाव ठेवल्याने त्याचे वाईट परिणाम पाहायला मिळतात. त्यामुळे नाव ठेवणं योग्य ती काळजी घ्यावी. नाहीतर नावं पडतात.
इंग्रजी तारखा आणि क्रमांक जे जगभरात सर्रास वापरले जातात, त्याच्या ठराविक लहरी आणि ऊर्जा असते आणि जेव्हा त्या चांगल्या नसतात तेव्हा त्याचा नक्कीच उलट परिणाम होतो. हीच गोष्ट, घराचा आकडे, मोबाईल नंबर, गाडीचा नंबर, बँक अकाउंटस यांना ही लागू होते. त्यामुळे आकडेसुद्धा गुडलक आणि भरभराट करणारे आहेत की नाही हे तपासावे.

First Published: Wednesday, March 27, 2013 - 19:01
comments powered by Disqus