योग्य दिशेला ठेवा मनीप्लांट

मनीप्लांट हे असे झाड आहे जे अनेकांच्या घरात पाहायला मिळते. असं मानलं जात की जसे जसे हे झाड वाढते घराचे वैभवही वाढत जाते. मात्र वास्तुशास्त्रानुसार जर मनीप्लांट योग्य दिशेत ठेवले नाही तर ते अशुभही ठरु शकते. 

Updated: Sep 24, 2016, 11:54 AM IST
योग्य दिशेला ठेवा मनीप्लांट  title=

मुंबई : मनीप्लांट हे असे झाड आहे जे अनेकांच्या घरात पाहायला मिळते. असं मानलं जात की जसे जसे हे झाड वाढते घराचे वैभवही वाढत जाते. मात्र वास्तुशास्त्रानुसार जर मनीप्लांट योग्य दिशेत ठेवले नाही तर ते अशुभही ठरु शकते. 

1. मनीप्लांट कधीही उत्तर-पूर्व दिशेला ठेवू नका. यामुळे पैशांचे नुकसान होते तसेच नात्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

2. मनीप्लांटची वेल कधीही जमिनीवर पसरवू देऊ नका. यामुळे नुकसान होते. 

3. मनीप्लांटचे झाड कधीही सुकू देऊ नका. 

4. मनीप्लांटचे झाड दक्षिण-पूर्व दिशेला ठेवणे चांगले मानले जाते. यामुळे घरातील सुख-समृद्धी वाढते.

5. मनीप्लांट पूर्व-पश्चिम या दिशेला ठेवू नका. यामुळे पती-पत्नीच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो.