कोण आहेत कल्की?, का घेणार कल्की अवतार?

हिंदू धर्माच्या पौराणिक मान्यतेनुसार कल्कीला विष्णूचा अवतार देखील मानण्यात येतो. पौराणिक कथेनुसार कलियुगात पापाची सीमा पार होण्यासाठी जगात दुष्टांचा संहार करण्यासाठी, कल्कीचा अवतार असेल, आणि धर्म ग्रंथानुसार कलियुगात भगवान विष्णू कल्कीच्या रूपात अवतार घेईल. कल्की अवतार कलियुगाच्या शेवटच्या टप्प्यात होईल, कल्की देव म्हणूनही कल्की यांची ओळख आहे.

Updated: Jan 21, 2016, 03:05 PM IST
कोण आहेत कल्की?, का घेणार कल्की अवतार? title=

नवी दिल्ली : हिंदू धर्माच्या पौराणिक मान्यतेनुसार कल्कीला विष्णूचा अवतार देखील मानण्यात येतो. पौराणिक कथेनुसार कलियुगात पापाची सीमा पार होण्यासाठी जगात दुष्टांचा संहार करण्यासाठी, कल्कीचा अवतार असेल, आणि धर्म ग्रंथानुसार कलियुगात भगवान विष्णू कल्कीच्या रूपात अवतार घेईल. कल्की अवतार कलियुगाच्या शेवटच्या टप्प्यात होईल, कल्की देव म्हणूनही कल्की यांची ओळख आहे.

पौराणिक मान्यतांनुसार कल्की ६४ कलांनी युक्त असेल. पुराणांनुसार उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्ह्यात संभल या ठिकाणी, विष्णुयशा नावाच्या तपस्वी ब्राह्मणाच्या घरी भगवान कल्की यांनी पुत्र रूपात जन्म घेतला. कल्की देवदत्त नावाच्या घोड्यावर स्वार होऊन जगातील पापी लोकांचा नाश करणार आहे, आणि धर्माची पुन:स्थापना करणार आहे.

पुराणात असं म्हटलंय की, भगवान विष्णु एकूण २४ अवतार धारण करणार आहेत, त्यातील २३ अवतार धारण करून झाले आहेत. कल्की हा २४ वां अवतार असेल. या २४ अवतारांमधून भगवान विष्णु यांचे १० अवतार महत्वाचे मानले जातात. यात मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार, बुद्ध अवतार, कल्कि अवतार यांचा समावेश आहे.

पौराणिक मान्यतांनुसार कल्कीला अवतार घेण्याची वेळ जवळ आली आहे. भगवान श्री कृष्ण ने गीता में कहा है कि 'यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे।