जपमाळ १०८ मण्यांची का असते?

By Jaywant Patil | Last Updated: Wednesday, May 15, 2013 - 16:21

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जपाच्या माळ हातात घेऊन जप करताना तुमच्या लक्षात आलं असेल, की माळेमध्ये १०८ मणी असतात. माळ रुद्राक्षाची असो, तुळशीमाळ असो, स्फटिकाची असो किंवा मोत्यांची असो... माळेतील मण्यांची संख्या १०८च असते. काय आहे यामागचं कारण?
रुद्राक्ष माळा सर्वश्रेष्ठ मानली जाते. कारण ती शिवशंकरांचं प्रतिक मानली जाते. जप किंवा देवाचं नामस्मरण करताना एक ठराविक संख्या मनात धरून नामस्मरण केलं जावं, असं शास्त्रांत नमुद केलं आहे. संख्याहीन जप नामस्मरणाचं पूर्ण फळ देत नाही. जपमाळेने नामस्मरण करणाऱ्याच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात.
दिवसाच्या बारा तासांमध्ये मनुष्य १०८०० वेळा श्वासोच्छ्वास करत असतो. प्रत्येक श्वासासोबत त्याने नामस्मरण करावं, अशी कल्पना असते. मात्र एवढं शक्य नसल्यामुळे १०८०० पैकी १०८ वेळा नामस्मरण करावं. १०८ हा अंक पार केला की जपमाळेमध्ये एक मेरूमणी असतो. तो १०८ अंक पूर्ण झाल्याची सूचना हाताला देतो. त्यामुळे नेहमी १०८ वेळा जप करण्याची प्रथा आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, May 15, 2013 - 16:21
comments powered by Disqus