शिंक येणे अशुभच नाही तर शुभही

By Prashant Jadhav | Last Updated: Monday, June 3, 2013 - 08:20

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिंक येणे ही शरीरातील एक सामान्य प्रक्रिया आहे. परंतु पुरातन काळापासून एखादे शुभ कार्य करत असताना शिंक येणे म्हणजे अशुभ मानले गले आहे.
शिंक येणे काही ठिकाणी शुभ तर काही ठिकाणी अशुभ मानले जाते. त्यातील काही शुभ व अशुभ घटना खाली सांगितल्या आहेत.
१ - तुम्ही घरातून बाहेर पडत असताना कोणी शिंकले तर तुमच्या कामात अडथळा निर्माण होणार. तीच व्यक्ती एकपेक्षा जास्त वेळेस शिंकली तर तेच काम सहजतेने पूर्ण होईल.
२ - घरात आलेला पाहुणा जाण्याच्या वेळेस कोणी त्याच्या डाव्या बाजूस शिंकले तर तो एक अशुभ संकेत असतो.
३ - खरेदी करताना शिंक आली तर खरेदी केलेल्या वस्तुत फायदा होतो.
४ - झोपण्याच्या अगोदर किंवा झोपेतून उठल्यानंतर शिंकेचा आवाज ऐकला तर अशुभ मानण्यात येते.
५ - नवीन घरात प्रवेश करतांना शिंक आली तर त्या घरात त्यावेळेस प्रवेश करू नये.
६ - एखादा आजारी मनुष्य औषधी घेण्यासाठी निघाला आणि त्याला शिंक आली तर तो लवकर बरा होतो.
७ - जेवण करण्याच्या अगोदर शिंकेचा आवाज ऐकला तर अशुभ मानण्यात येते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Monday, June 3, 2013 - 08:16


comments powered by Disqus