नागपूर - विकासाचा सुवर्णमध्य!

By Aparna Deshpande | Last Updated: Wednesday, June 11, 2014 - 11:34

www.24taas.com , अभिषेक देशपांडे, सॉफ्टवेअर इंजिनिअर, मनातले आतले!
`सतत प्रवास करणारा- The Frequent Flyer` अशी बिरूदं मिरवणारा मी जेव्हा माझ्या स्वगृही म्हणजे नागपूरला `Zero down` होतो, तेव्हा मात्र वाटतं की नागपुरातच आणि नागपूरसाठी काहीतरी करता आलं तर `nothing like that`.
या आठवड्यातील नागपूर-पुणे विमान प्रवास खूप काही तरी बोलून गेला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूर विमानतळाला खऱ्या अर्थाने जगाच्या नकाशावर कसा नेवू याचं जणू फ्रेमवर्कच बनवत होतो मी.
भौगोलिक दृष्ट्या देशाच्या हृदयस्थानी असलेले नागपूर शहर... मध्य भारतातील सगळ्याच महत्त्वाच्या शहरांशी जोडल्या गेले आहेत. जर आपण या अस्तित्वात असणाऱ्या `infrastructure` चा पुरेपुर वापर केला तर `Zero Miles`चा `Unlimited Smiles` व्हायला यत्किचिंतही वेळ लागणार नाही.
नागपूर आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात उपलब्ध असलेल्या जागेत जर आपण नागपूर अमरावती/चंद्रपूर/यवतमाळ/रायपूर-भिलाई अशा वॉल्वो बसेस सुरू केल्या तर मध्य भारतातलं एक बिझी एअरपोर्ट म्हणून नागपूर नावारूपाला येवू शकतं.

तसंच नागपूर एअरपोर्टवरून रेल्वे स्टेशन आणि शहराच्या अनेक भागांमध्ये जायला एसी बस सेवा सुरू केल्यास नागपूरकरांना एअरपोर्टला जाण्यास सोय होईल.
माझ्यामते नागपूरातून अधिकाधिक विमान सेवा सुकू करण्यास काहीही हरकत नाही कारण नागपूर आमि विदर्भातील प्रचंड टॅलेंट पुणे, मुंबई, बंगळुरू, दिल्ली अशा शहरांमध्ये आहे. केवळ नागपूरला यायला तिकिट मिळत नाही म्हणून आपल्या गावात ना येवू शकणाऱ्यांची संख्या पण बरीच आहे. प्रत्येकालाच आपल्या घरी यायची ओढ असते आणि त्यासाठी माणून कुठल्याही मार्गानी येण्याची धडपड करत असतो. जर आपण रेल्वे, रस्तेमार्गासोबतच हवाई मार्गाचा विकास करू शकलो तर नक्कीच नागपूर आणि पर्यायानी विदर्भाच्या विकासाचा सुवर्ण मध्य साधता येईल.
मी नागपूरकर या नात्यानं सर्वतोपरी विकासाच्या कार्यात हातभार लावण्यास तयार आहे. चला नागपूरला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवूयात. नागपूक बद्दलची ओढ जन्मभूमिवर असलेलं प्रेम मला या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यास भाग पाडतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 11, 2014 - 11:30
comments powered by Disqus