नैराश्य (Frustration)

 आयुष्यात अनेक गोष्टींमुळे आपल्याला नैराश्य येतं. या नैराश्याचा आपल्या दैनंदिन जीवनात फार परिणाम होतो. या नैराश्यामुळे आपल्या वागण्यात ही बदल होतो. काही वेळा तो Short Term असतो तर काही वेळा Long Term. 

Updated: Oct 9, 2014, 07:26 PM IST
 नैराश्य (Frustration) title=

समीर पाटणकर  :  

आयुष्यात अनेक गोष्टींमुळे आपल्याला नैराश्य येतं. या नैराश्याचा आपल्या दैनंदिन जीवनात फार परिणाम होतो. या नैराश्यामुळे आपल्या वागण्यात ही बदल होतो. काही वेळा तो Short Term असतो तर काही वेळा Long Term. 

या फालतूच्या नैराश्यामुळे आपला Band वाजतो.काहीजण हे नैराश्य घालवण्यासाठी दारू पितात, तर काही लोक चीड चीड करतात. ते प्रत्येक व्यक्तीनुसार आपणास जाणवतं. त्यासाठी गहन निरीक्षणाची आवश्यकताही नसते. ते आपल्याला सहज जाणवून येतं. कदाचित आपल्याला ही माझा  Blog वाचताना वाटलं  असेल की, या पट्ठ्याला ही कोणत्यातरी प्रकारचं Frustration आलेलं दिसतंय. असं  तुम्हाला वाटत असेल तर अगदी बरोब्बर ओळखलंत. मलाही Frustration आलंय आणि ते व्यक्त  करायचं साधन म्हणजे हा Blog इतकाच काय तो फरक. 

चला तर आता माझ्या आगळ्या वेगळ्या Frustration वर येऊया… 

मला सध्या आलेलं  Frustration म्हणजे "Bollywood (हिंदी) चित्रपटांमुळे  आलेलं नैराश्य".
आता नावातच हे नैराश्य म्हणजे काय ते तुम्हाला कळलं असेलच. तरी विस्तृतपणे यावर बोलूया… 
सध्या एवढे हिंदी चित्रपट बघण्याचा योग आला. आता याला योग म्हणावा की दुर्दैव 

एकाही चित्रपटाकडून  समाधान मिळालं  नाही. स्पष्टच सांगायला गेलो तर अगदी थुकरट पद्धतीचे हे चित्रपट. मान्य आहे काळ  बदललाय परंतु हे असे प्रकार? "Entertainment" च्या नावाखाली थिल्लरपणा नुसता!

नैराश्य आलंच. त्यात भर म्हणजे या लोकांसाठी पैसा ही गेला. आता एखादा म्हणेल कशाला चित्रपट पाहिलेस, तर त्यावर उत्तर असं  की पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून हे बघणं भाग आहे! हे वर्णन करतोय त्यात आलेले चित्रपट म्हणजे KICK, Humpty Sharma वगैरे…. !

काही मराठी चित्रपट हे एवढे सुंदर असूनही त्याची लोकप्रियता,त्यांना मिळणारा पैसा हा Restricted आहे हे जेव्हा डोळ्यासमोर येतं  आणि दिसत तेव्हा Helpless व्हायला  होतं. 
"चित्रपटातून लोकांना प्रबोधन मिळण्याचा उद्देश हा खूप लांब फेकला गेलाय आणि भलताच चावटपणा वाढत चाललाय". बहुतांशी लोकांना,माझ्या वयाच्या  तरूणांना ही यातच रस आहे हे बघून जीव तुटतो. आणि मग 

'तत्वज्ञान शिकवू नकोस. काहीही होणार नाही, तू पण  बघायला चल, मजा कर'  या गोष्टींचा बोलबाला  वाढतो. 

वैचारिक, तात्त्विक, प्रबोधनपर चित्रपट  संपणार तर नाहीत  ना? या विचाराने जीव आणखीन कासावीस होतो. बर, माझं वय ४० किव्हा ६० नाही ना! माझं  वय  फक्त २० वर्ष! त्यामुळे ही होणारी घुसमट आणखीन त्रास देते. कारण या माझ्या वयाच्या पिढी बरोबर अजून कितीतरी वर्ष काढायची आहेत. अजून कितीतरी घुस्मटिंना, नैराश्याला तोंड द्यायचंय. मराठीत असे प्रबोधनकारक, वैचारिक चित्रपट येत आहेत परंतु भाषा न कळल्यामुळे अमराठी भाषिकांना बघायला अडचण येत आहे. आणि या अडचणीमुळे ते मराठी चित्रपट चांगले असूनही बघणं टाळतात. अमराठी लोक असे दर्जेदार मराठी चित्रपट बघतातही. परंतु अश्यांचे प्रमाण किती? याचा आपण  विचार करायला हवा. 

बर पुढची अडचण अशी की, काही दर्जेदार चित्रपट ठराविक ठिकाणीच प्रदर्शित होतात. त्यामुळे इतर ठिकाणी राहणाऱ्या लोकांचा हिरमोड होतो. उदा. अस्तु  हा मराठी चित्रपट, अनेक चित्रपट फेस्टिवल मध्ये चमकला. त्याची चर्चाही झाली. मोहन आगाशे, मिलिंद सोमण यांसारखे कलाकार यात आहेत. परंतु माझ्या माहिती प्रमाणे अजून हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झालेला नाही. तो फक्त पुण्यात प्रदर्शित झालेला आहे. आता या मागे अनेक कारण आहेत. याला मुंबईतले प्रेक्षकही जबाबदार आहेत. 

कित्येक हिंदी चित्रपटही सुंदर आहेत. परंतु आज जे चाललय त्यामुळे माझा हा रोष हिंदी चित्रपटांच्या विरोधात आपल्याला जाणवेल. हिंदी चित्रपटांमधील वापरली जाणारी गाणी ही चुकीचा प्रभाव पडतात. सगळ्यात ताजं उदा. घेऊ, Singham Returns चित्रपटातील " आता माझी सटकली, मला राग येतोय". 

आता मला सांगा याला काही अर्थ? जर  नीट विचार केला तर आपल्याला लक्षात येईल याचा परिणाम खूप वाईट पद्धतीने होतो. अमराठी भाषिकांना असा गैरसमज होतो की मराठी गाणी अशीच असतात. अर्थ नाही, केवळ मनोरंजन. कारण आमच्या वयाची ही लोक "पाहिले न मी तुला " ही गाणी थोडीच ऐकणार आहेत. 

अपेक्षा करतो की येणारा पुढचा काल सुधारेल, नाही तर काय आपलं  हे नैराश्य व्यक्त करायला आहेच हा आपला Blog!!!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.