`फेसबुक`ला दहा वर्षानंतरही स्पर्धक नाही

Last Updated: Tuesday, February 4, 2014 - 22:06

www.24taas.com, जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई

फेसबुक आज दहा वर्ष पूर्ण करीत आहे. यावरून फेसबुक आणखी किती वर्ष?, यावरून नेटीझन्समध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
सोशल नेटवर्किंग साईट ऑर्कुटकडे नेटीझन्सने जेवढ्या लवकर पाठ फिरवली, तेवढ्या लवकर फेसबुक लोकांच्या मनातून आणि उपयोगातून जाणं कठीण आहे.
ऑर्कुटने सोशल नेटवर्किंगची सुरूवात
सोशल नेटवर्किंग म्हणजे काय?, ऑनलाईन मित्र मैत्रिणींना भेटण्यासाठी सोशल नेटवर्किंग कसं उपयोगात येतं, हे ऑर्कुटने शिकवलं. पण फेसबुकवर ऑर्कुटपेक्षा अधिक सुविधा असल्याने नेटीझन्सने ऑर्कुटला तात्काळ नमस्कार ठोकला.
सोशल नेटवर्किंगला ऑर्कुटपर्यंत नेटसर्फिंग असं म्हटलं जायचं, फेसबुक काळात सोशल नेटवर्किंग म्हटलं जातं, म्हणजेच फेसबुक उपयोगात येणारं माध्यम झालं आहे.
फेसबुकमध्ये रोजचे बदल होत आहेत, आणि फेसबुकवर सर्वच सेलिब्रिटी आणि राजकारणीही येऊन पोहोचले आहेत.
फेसबुकचं काय होणार?
ऑर्कुट ज्या प्रमाणे संपलं, त्याप्रमाणे फेसबुकचं काहीसं होणार आहे, असे अंदाज आजही बांधले जातात.
मात्र अंदाज हे शेवटी अंदाजच असतात, सोशल नेटवर्किंगवर रिसर्च करणाऱ्या अनेक संस्थांनी फेसबुकला अजूनही धोका नसल्याचं म्हटलं आहे.
फेसबुकनंतर तिसरी कोणती सोशल नेटवर्किंग साईट लोकांच्या मनात आली असेल, तर ती ट्वीटर. ट्वीटरवर काही अक्षरात लिहण्याची सोय आहे.
हे अनेकांना आवडलं असलं, तरी ट्वीटरचा एक क्लास मात्र ठरला आहे. तेव्हा ज्यांना फक्त फोटो, व्हिडीओ आणि नातेवाईकांचे फोटो, मित्र मैत्रिणींचे अपडेट पाहायचे आहेत, ते फेसबुकवरच जास्त रमले, त्यांनी ट्वीटरचे अकाऊंटही ओपन केले, मात्र ते ट्वीटरवर जास्त फिरकले नाहीत.
ट्वीटर आणि फेसबुकला एकमेकांचा धोका आहे का?
जगात घडणाऱ्या घटनांवर तात्काळ भाष्य करण्यासाठी ट्वीटर आहे, मात्र ट्वीटर आणि फेसबुक हे सरळ-सरळ कधी प्रतिस्पर्धी ठरले नाहीत.
मात्र फेसबुक आणि ऑर्कुटची कुस्ती रंगली आणि अवघ्या वर्षभरात फेसबुकने ऑर्कुटला आसमान दाखवलं होतं.
ट्वीटरवर फार कमी शब्दात लिहिता येतं, यामुळे फार कमी लोकांना अचूक आणि कमी शब्दात आपलं मत मांडता येतं. म्हणून एक वेगळा क्लास ट्वीटरचा वापर करतो.
फेसबुकनंतर नावारूपाला आलेलं ट्वीटरही फेसबुकचा प्रतिस्पर्धी ठरलेलं नाही. म्हणून फेसबुकला आजही भविष्य असल्याचं सांगण्यात येत आहे.
व्हॉटस ऐप आणि फेसबुकची वाढती कमाई
व्हॉटस ऐप सारख्या ऐपनाही अनेक ऐप टक्कर द्यायला उभे ठाकले आहेत. त्यामुळे हे ऐपही फेसबुकवर फार कमी परिणाम करतील हेच सध्या सांगता येईल.
फेसबुकचं उत्पन्न २०१३ साली ५५ टक्क्यांनी वाढलं आहे, कमाई ८७ अब्ज डॉलर झाली आणि नफा सात टक्क्यांनी वाढला.
फेसबुकने आता मोबाईल एडव्हटायझिंगवर जोर दिलाय. मोबाईलच्या जाहिरातींमध्ये आश्चर्यकारक पद्धतीने लोकांना खेचण्याची ताकद आहे.
फेसबुकवर २५ ते ५५ चा वयोवर्ग वाढला
फेसबुकवर एका बाजूला तरूणांचा वावर कमी झाला आहे असं सांगण्यात येतं, मात्र १८ ते २४ वर्ष वयोगटानंतर २५ ते ५५ वयोगटही फेसबुकवर वाढतोय.
हा क्लास बाजारात पैसे खर्च करत असल्याने, जाहिरात कंपन्यांसाठी या वर्गाला वेगळं महत्व आहे.
फेसबुकला टक्कर देण्यासाठी गुगलने गुगल प्लस आणलं, पण अजून गुगल प्लसला यश लाभलेलं नाही.
फेसबुकवर येणारे फोटो आणि माहिती पुढे जाऊन गुगल प्रमाणे झाली, तर भविष्यात फेसबुक स्वत:कडे गूगल सारखं `डाटा-समृद्ध` झाल्या सारखं पाहणार नाही, हे कशावरून?

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 4, 2014 - 22:03
comments powered by Disqus