LIVE – बजेट २०१३-१४ ची वैशिष्ट्ये, Union Budget 2013 Live

बजेट २०१३-१४ ची वैशिष्ट्ये

बजेट २०१३-१४ ची वैशिष्ट्ये
www.24taas.com, नवी दिल्ली

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम संसदेत २०१३-१४ या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करत आहेत. पी. चिदंबरम यांचे अर्थमंत्री म्हणून हे आठवे बजेट असून ते आज संसदेत बजेट सादर करत आहेत. सर्वसामान्यांच्या नजरा मात्र आपल्या खिशाला आणखी ताण पडणार की थोडा फार दिलासा मिळणार याकडे लागून राहिलंय. चला, पाहुयात काय काय मांडलं गेलंय या अर्थसंकल्पात...

अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे –

काय स्वस्त, काय महाग
>तयार कपडे स्वस्त होणार
>मोटारसायकल, महागड्या गाड्या महागणार
>मार्बल महागणार
>औषध महागले
>चांदी महागली
>वातानुकुलित हॉटेल्सण महागणार
>सर्व वातानुकुलित हॉटेल्स‍ सेवाकरांच्यार कक्षेत
>सिगारेटवर १८टक्के उत्पायदन शुल्कई, सिगारेट आणि सिगार महागणार
>आयात केलेले रेशीम महागणार
>चामड्याच्या जोड्यांवर निर्यात करात घट
>२ हजारांपेक्षा जास्त किंमतीचे मोबाईल महागणार
>सिगारेट महागणार
>परदेशी बाईकही महागणार
>परदेशी गाड्या महागणार
>परदेशी बूट स्वस्त होणार
>मोटरसायकल महागणार
>टीव्हीचा सेट टॉप बॉक्स महाग
>फोन बील आणि अन्न महागणार नाही

इन्कम टॅक्समध्ये किती फायदा
>५ लाख उत्पन्न - २००० रुपये फायदा
>४ लाख उत्पन्न - २००० रुपये फायदा
>३ लाख उत्पन्न - २००० रुपये फायदा
>इन्कम टॅक्समध्ये तुमचा फायदा - १ लाख उत्पन्न - ० रुपये
>२ लाख २० हजार उत्पन्नावर टॅक्स नाही
>आयकर रचनेत कुठलाही बदल नाही
>इनकम टॅक्स स्लॅब बदलणार नाही
>पाच लाखांवर उत्पन्न असणाऱ्यांना कोणतीही सूट नाही
>श्रीमंतांचा टॅक्स वाढला, मध्यमवर्गावर बोजा नाही
>१ कोटी रूपयापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना बसणार सरचार्ज
>अतिश्रीमंतांवर १० टक्के् सरचार्ज लागणार
>५ लाख उत्पन्न असलेल्यांना २ हजार रुपये सूट
>कर सुधारणेसाठी आयोगाची नेमणूक करणार
>टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही

कर प्रणाली
>महिला १ लाख रुपयांपर्यंतचे सोने परदेशातून आणू शकतात
>एक्साईज ड्यूटी (अबकारी कर) कोणताही बदल नाही
>सर्विस टॅक्स (सेवा कर) कोणताही बदल नाही
>भारतात ४२८०० लोकांचे १ कोटी पेक्षा अधिक उत्पन्न्

मालमत्ता विक्री
>कृषी जमीन खरेदी-विक्रीवर टीडीएस नाही
>५० लाखांपेक्षा अधिकची संपत्ती विकल्यास १ टक्के टीडीएस

महिलांसाठी
>दिल्लीच्या घटनेनंतर १ हजार कोटीचा निर्भया फंड
>महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार
>महिलांसाठी सुरू होणाऱ्या बँकेत फक्त् महिलांनाच खाते
>बचतगटातील महिला आणि घर कामगार करणा-या महिलांसाठी विमा योजना
>महिला विशेष बँकेसाठी ऑक्टोगबर २०१३ पर्यंत बँकिंग परवाना
>महिला सार्वजनिक बँकेसाठी १ हजार कोटी रुपंयाचा सरकारकडून निधी
>अर्थमंत्र्यांची महिलांसाठी ऐतिहासिक घोषणा । महिला सक्षमीकरणावर दिला भर
>बॅंकेतील सर्व कर्मचारी महिलाच असणार
>महिलांची सरकारी बँक १०० कोटी रुपयांनी सुरू होणार
>महिलांसाठी सार्वजनिक क्षेत्रात पहिली बॅंक सुरू होणार
>महिलांसाठी पहिली बँक सुरू होणार

कृषी
>खासगी बॅंकांतून शेतकऱ्यांना घेता येणार कर्ज
>राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी ९९५४ कोटी रुपये
>यंदाच्या बजेटमध्ये शेतीसाठी भरीव तरतूद
>शेतीसाठी ७ लाख कोटीं कर्जाची तरतूद
>कृषी मंत्रालयासाठी २७ हजार कोटींची तरतूद
>कृषी संशोधनासाठी ३४१५ कोटींची तरतूद
>कृषिविकासाठी ९९० कोटी रुपये
>वेळेवर कर्ज परतफेड करणा-या शेतक-यांना मिळणार सूट
>छोट्या शेतकऱ्यांसाठी १०० कोटींचा क्रेडिट फंड

विमा
>विमाच्या थर्ड पार्टी क्लेमसाठी न्यायालय स्थापन होणार
>आरोग्य विमा योजनेत रिक्षा चालकही येणार
>१०००० लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात LIC ऑफीस
>ऑटो रिक्षा आणि रद्दीवाल्यां्नाही आरोग्य विम्याऑचा लाभ होणार

बँकिंग
>सरकारी बँकांच्या सर्व शाखांमध्ये ATM सेंटर सुरू करणार
>सर्व सरकारी बँका ऑनलाइन होणार
>सरकारी बँकासाठी १४००० कोटी रुपये

एफएम रेडिओ
>२९४ शहरांमध्ये खासगी एफएम
>१ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात एफएम रेडिओ

होमलोन व्याज सूट
>पहिल्या घराच्या २५ लाखाच्या कर्जावरील व्याजावर आता एकूण सूट २.५ लाखांची सूट
>पहिल्या घराच्या २५ लाखाच्या कर्जावरील व्याजावर १ लाखांची सूट


इतर ठळक मुद्दे
>१० टक्क्यांपेक्षा कमी गुंतवणूक करणारे एफआयआयमध्ये
>टपाल खात्याच्या विकासासाठी ४ हजार कोटींची तरतूद
>लघुउद्योजकांना गुंतवणुकीवर मिळणार कर सवलत
>१० लाख युवकांना रोजगाराची संधी
>७ नवी शहरे आणि २ स्मार्ट सिटीजचा विकास करणार
>सर्व राज्यांना ५ लाख कोटींपेक्षा अधिक मदत
>पटियालामध्ये स्पोर्ट्स कोचिंग इन्स्टिट्यूट सुरू करणार
>बँकेसारखे काम करणार पोस्ट ऑफिस
>देशाच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी तरतूद करण्याचे आश्वासन
>पवन ऊर्जा प्रकल्पासाठी ८०० कोटींची तरतूद
>कच-यापासून वीज निर्मितीला देणार प्रोत्साहन
>संरक्षणासाठी २ लाख ३ हजार कोटींची तरतूद
>इक्विटी स्कीमची कालमर्यादा तीन वर्षांपर्यंत वाढवली
>शेअर बाजारात परदेशी गुंतवणूक सोपी होणार
>वस्त्रोद्योग विकासासाठी १०० कोटी
>विणकरांना ६ टक्के व्याजाने कर्ज मिळणार
>१२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न गटातील नागरिक इक्विटी फंडमध्ये गुंतवणुकीस पात्र
>वर्षभरात दाभोळ प्रकल्प (आताचा रत्नागिरी गॅस प्रकल्प) कार्यान्वीत होणार
>जेएनएनयूआरएमसाठी १४ हजार ८७३ कोटींची तरतूद (जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना)
>एससी, एसटी वर्गातल्या तरूणांसाठी विविध योजना सुरु करणार
>वैद्यकीय शिक्षणासाठी ४ हजार ७२७ कोटींची तरतूद
>आयुर्वेद आणि युनानी संशोधनासाठी १६९ कोटींची तरतूद
>एससी, एसटी विद्यार्थ्यांसाठी ५ हजार २८४ कोटींची शिष्यवृत्ती योजना
>पहिल्या घराच्या २५ लाखाच्या कर्जावर १ लाखांची अतिरिक्त सूट
>शीतगृह आणि चेअरहाऊस उभारण्यासाठी ५००० कोटी
>राजीव गांधी योजनेचा विस्तार करणार
>घरगुती बचतीमध्ये ६ टक्क्यांनी घट झाली
>५० हजार कोटींच्या कर्जरोख्यांची परवानगी
>रस्ते बांधणीसाठी नियंत्रण मंडळाची स्थापना
>४७ टक्के निधी खासगी क्षेत्रातून उभा करणार
>शिक्षण आणि आरोग्यासाठी ३७,३०० कोटींची तरतूद
>नालंदा विद्यापीठ पुन्हा उभारणार
>ग्रामीण भागातील बजेटमध्ये ४५ टक्क्यांनी वाढ
>पायाभूत सुविधांसाठी ५५ लाख कोटींची गरज
>अन्न सुरक्षतेसाठी १० हजार कोटींची तरतूद
>५० हजार कोटींची करमुक्त बॉन्ड
>मूलभूत सेवा सुविधासाठी ५५ लाख कोटी खर्च करणार
>पूर्वांचलच्या कृषी विकासासाठी १ हजार कोटींची तरतूद
>अन्न धान्य सुरक्षेसाठी १० हजार कोटी
>चीन आणि इंडोनेशिया जीडीपीत भारताच्या पुढे -चिदंबरम
>कृषीकर्जासाठी ७ लाख कोटी
>पर्वतीय राज्यांसाठी जास्त १५००० बस खरेदी करणार
>पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी २१७०० कोटी
>मनरेगासाठी ३३००० कोटी रुपये
>मिड डे मीलसाठी १३२१५ कोटी रुपये
>सरकारचा वाढत असलेला तोटा मुख्य चिंतेचे कारण आहे - पी. चिदंबरम
>तेल आणि डाळींचे उत्पादन घटलेय - चिदंबरम
>आरोग्य अभियानासाठी २१हजार कोटी
>६५००० कोटीपेक्षा अधिक शिक्षणावर खर्च करणार
>४७०० कोटी रुपये वैद्यकीय शिक्षणासाठी
>राष्ट्रीय स्वास्थ मिशनसाठी २१२३९ कोटी रुपये
>आदिवासीसाठी २४ हजार कोटी खर्च करणार
>दलित-आदिवासांचा पैसा त्यांच्यासाठीच खर्च होणार
>दलितांसाठी ४१ हजार कोटी देण्यात येणार
>परदेशी गुंतवणूक, कर्ज आणि एफआयआय हे तीनच रस्ते आपल्याकडे
>पुरवठा आणि मागणीत समन्वय नाही
>खान-पानाच्या वस्तुंची महागाई सर्वात मोठी चिंता
>यंदा १४ लाख ३० हजार रुपये खर्च केले
>पुढील वर्षात १६ लाख ६५ खर्च करणार
>सर्व महत्वाच्या योजनांवर खर्च करण्यात आला - चिदंबरम
>तेल आणि डाळींचे उत्पादन घटलेय - चिदंबरम
>महागाईविरोधात सर्वबाजूने लढावे लागेल - चिदंबरम
>महागाई रोखणे मोठे आव्हान आहे - चिदंबरम
>थेट विदेशी गुंतवणूक अत्यावश्यक आहे. त्यामुळे महागाईवर नियंत्रण आणणे शक्य - पी. चिदंबरम
>अपेक्षित विकासदर गाठणे मोठे आव्हान आहे - पी. चिदंबरम
>सरकार सर्वसमावेशक विकासाबाबत बांधिल - चिदंबरम
>चीन आणि इंडोनेशिया जीडीपीत भारताच्या पुढे -चिदंबरम
>आमचे लक्ष आहे टिकावू विकासावर केंद्रीत करण्यावर - पी. चिदंबरम
>अर्थव्यवस्था कठिण परिस्थितीतून जात आहे - पी. चिदंबरम

First Published: Thursday, February 28, 2013, 10:22


comments powered by Disqus