२०१३-१४ ची आयकर मर्यादा

आज जाहीर करण्यात आलेल्य़ा देशाच्या अर्थसंकल्पात प्राप्तीकरासंदर्भात पुढील स्लॅब्स तयार करण्यात आले आहेत. कराच्या बाबतीत कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 28, 2013, 01:57 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
आज जाहीर करण्यात आलेल्य़ा देशाच्या अर्थसंकल्पात प्राप्तीकरासंदर्भात पुढील स्लॅब्स तयार करण्यात आले आहेत. कराच्या बाबतीत कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही.
जर वर्षाचं उत्पन्न २ लाख २० हजार रुपयांपर्यंत असल्यास कुठलाही प्राप्तीकर भरावा लागणार नाही. २ लाख २० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असल्यास १० % प्राप्तीकर भरावा लागेल.त्याहून अधिक उत्पन्न असल्यास म्हणजेच ५ लाख रुपये ते १० लाख रुपयांदरम्यान वार्षिक उत्पन्न असल्यास ३०,००० रुपये + २०% प्राप्तीकर भरावा लागेल. १० लाख रुपयांहून अधिक वार्षिक उत्पन्न असल्यास त्यांना १,३०,००० रुपये + ३०% प्राप्तीकर भरावा लागेल.

गेल्या वर्षीपर्यंत ज्या महिला ६५ वर्षांपर्यंत असतील, त्यांच्यासाठीही प्राप्तीकराचे स्लॅब्स स्पष्ट करण्यात आले आहेत. जर महिलांचे वार्षिक उत्पन्न २ लाख २० हजार रुपयांपर्यंत असेल, तर त्यांना कुठलाही कर भरावा लागणार नाही. जर वार्षिक उत्पन्न २ लाख २० हजार ते ५ लाख रुपयापर्यंत असेल, तर त्यावर १० % कर भरावा लागेल. त्याहून अधिक म्हणजेच ५ लाख रुपये ते १० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्यास त्यांना ३०,००० रुपये+ २०% प्राप्तीकर भरावा लागेल. १० लाख रुपयांहून अधिक वार्षिक उत्पन्न असल्यास १,३०,००० रुपये + ३०% प्राप्तीकर भरावा लागेल.

वयोमर्यादा गेल्यावर्षीपर्यंत ६० ते ८० या दरम्यान असल्यास प्राप्तीकर मर्यादा काय असेल?-
२ लाख ५० हजार रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असल्यास कुठलाही आयकर भरावा लागणार नाही. २,५०,००० रुपये ते ५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असल्यास १०% प्राप्तीकर भरावा लागेल. ५ लाख रुपये ते १० लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असल्यास २५,००० रुपये + २०% आयकर भरावा लागेल. १० लाखांहून अदिक उत्पन्न असल्यास १,२५,००० रुपये + ३०% प्राप्तीकर भरावा लागेल.
वय ८० वर्षांच्या पुढे असल्यास-
५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्यास कुठलाही आयकर भरावा गणार नाही. ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असल्यास २०% प्राप्तीकर भरावा लागेल. १० लाख रुपयांवर वार्षिक उत्पन्न असल्यास १ लाख +३० % आयकर भरावा लागेल.