रेल्वे बजेट : भाडेवाढ नाही, पण छुपा सरचार्ज

By Shubhangi Palve | Last Updated: Tuesday, February 26, 2013 - 14:40

www.24taas.com, नवी दिल्ली
रेल्वे मंत्री पवन कुमार बन्सल संसदेत २०१३-१४ या वर्षासाठी रेल्वे अर्थसंकल्प सादर करत आहेत... तब्बल १७ वर्षांनंतर काँग्रेसचे रेल्वेमंत्री संसदेत बजेट सादर करत आहेत. सर्वसामान्यांच्या नजरा मात्र आपल्या खिशाला आणखी ताण पडणार की ट्रेनच्या सुविधांमध्ये थोडी फार भर पडून दिलास मिळणार याकडे लागून राहिलंय. चला, पाहुयात काय काय मांडलं गेलंय या अर्थसंकल्पात...

रेल्वे अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्दे...
> दुपारी १.२६ : संसदेची कार्यवाही स्थगित
> दुपारी १.२० मिनिट : छुपी रेल्वे भाडेवाढ करण्याचे रेल्वेमंत्र्यांचं संकेत... विरोधकांचा गोंधळ... गोंधळातच रेल्वेमंत्र्यांचं भाषण सुरू
> पंढरपूर - मंगळवेढा - विजापूर नवीन रेल्वे गाडी
> परभणी - मनमाड दरम्यान नवीन गाडी
> कल्याण- कर्जतमध्ये तिसरी रेल्वे लाईन टाकण्याचा प्रस्ताव
> ६७ नव्या एक्सप्रेस ट्रेन... तर २६ नव्या पॅसेंजर ट्रेन
> पाच मेमू आणि आठ डेमू ट्रेन सुरु करणार
> सुपरफास्ट आणि तात्काळ तिकीट दरांत वाढ
> आरक्षण आणि रद्दीकरण शूल्‍क वाढणार

> मुंबईत लोकलच्या अतिरक्त ७२ फेऱ्या
> मुंबईकरांसाठी खुशखबर : मुंबईत आणि कोलकातामध्ये वर्षभरात एसी लोकल धावणार
> बजेटमध्ये रेल्वे प्रवासी भाड्यात वाढ नाही ( प्रवाशांना दिलासा)
> प्रवासी भाड्यातून ३२,५०० कोटी नफ्याचं लक्ष
> जम्मूच्या कटारापर्यंत रेल्वे जाणार
> २०११-१२ मध्‍ये रेल्‍वेनं घेतलेलं तीन हजार कोटींचं कर्ज व्याजासहित फेडण्यात आलं
> राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्यांना प्रथम श्रेणी एसीचा पास
> सध्या स्वातंत्र्यसैनिकांना दरवर्षी त्यांचा पास रिन्यू करावा लागतो, आता तो तीन वर्षांनी रिन्यू करावा लागेल
> रायबरेलीत रेल्वेचा आणखी एक कारखाना उभारणार
> नागपुरमध्ये मोठे प्रशिक्षण केंद्र उभारणार
> मंदीमुळे मालवाहतुकीचं उद्दीष्ट गाठण्यात अपयश
> जुनं सामान विकून रेल्वे उभे करणार ४५०० करोड रुपये (विरोधकांचा गोंधळ)
> 'पैसा कमाना ही पैसा बचाना है'
> रेल्‍वेतील दीड लाख पदे भरण्‍यासाठी ६० शहरांमध्‍ये परीक्षा होणार
> एक लाख ५२ हजार पदं भरणार, अपंगांना आरक्षण मिळणार
> राज्‍य सरकारांच्‍या भागीदारीत फुट-ओव्‍हर ब्रिज बनवण्‍याचा विचार (विरोधकांचा गोंधळ)
> पाटणा, आग्रा, नागपूर, बंगळुरू, विशाखापट्टनम येथे राहण्‍याची अत्‍याधुनिक सुविधा देण्‍यासाठी लाऊंज उभारणार
> अरुणाचल प्रदेश प्रथमच रेल्वेच्या जाळ्यात
> विद्यार्थ्यांसाठी 'आझादी एक्सप्रेस'
> नागपूरमध्ये 'नीर' प्रकल्प उभारणार
> सर्व स्टेशन्सवर इलेक्ट्रॉनिक डिसप्ले बसवणार
> तिकीट विक्री प्रकिया पारदर्शक करणार
> रेल्वेतील खाद्यपदार्थांचे परिक्षण होणार
> सर्व रेल्वेगाड्यांमध्ये वाय-फायची सुविधा उपलब्ध करून देणार
> रात्री ११.३० ते १२.३० रेल्वे ऑनलाईन तिकिट विक्रि बंद राहणार
> मोबाईलच्या माध्यमातून रेल्वे तिकिट बुकिंग
> १०४ स्टेशन्सवर स्वच्छतेच्या विशेष सुविधा राबवणार
> ४०० स्टेशन्सवर लिफ्ट सुविधा मिळणार
> अपंग प्रवाशांसाठी रेल्वेत विशेष सुविधा राबवणार
> नंदन निलकेणी यांच्यासोबत आधारकार्ड रेल्वे सुविधांशी संलग्न करण्यासाठी केली चर्चा
> रेल्वे सुविधांसाठी 'आधारकार्डा'चा वापर करण्याविषयी विचार सुरू
> 'आरपीएफ'मध्ये महिलांना १० टक्के आरक्षण
> 'सिर्फ हंगाम खडा करना मेरा मकसद नही, मेरी कोशिश है की सुरत बदलनी चाहिए'
> रेल्वेमध्ये महिलांच्या सुरक्षेत वाढ; महिलांच्या सुरक्षेसाठी स्पेशल आठ स्वतंत्र बटालियन स्थापणार
> रेल्वे मार्गावर प्राण्यांची होणारे अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न
> सुरक्षेसाठी सिग्नल यंत्रणेत सुधारणेची गरज
> अपघातांची संख्य



First Published: Tuesday, February 26, 2013 - 11:38


comments powered by Disqus
Live Streaming of Lalbaugcha Raja